देहुरोड पोलीस स्टेशन कडुन वाहनचोरी करणारे ०२ आरोपी अटक करुन त्यांचेकडुन १४,४१,०००/- रुपये किंमतीच्या २१ मोठारसायकली जप्त करून एकूण मोटार वाहन चोरीचे २१ गुन्हे उघड
देहूरोड :
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाअंतर्गत मोटार सायकल चोरीचे वाढते प्रमाण लक्षात घेता मा. पोलीस आयुक्त साो, श्री. विनयकुमार चौबे यांनी पोलीस स्टेशन हद्दीतील मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्याना आळा घालण्यासाठी प्रभावीपणे उपाययोजना राबविणे व गुन्हे उघडकीस आणणे बाबत आदेशीत केले होते.
त्याअनुषंगाने देहुरोड पोलीस स्टेशनचे तपास पथकाला काही इसम चोरीची दुचाकी देहूरोड बाजार परिसरात स्वामी चौक येथे घेवून येणार आहे अशी बातमी मिळाली त्या बातमीच्या अनुषंगाने सदर ठिकाणी सापळा लावला असता बातमी प्रमाणे दोन इसम एका दूचाकी ज्युपीटर स्कूटर याच्यावरुन आले त्यांना तपास पथकांच्या अंमलदारानी शिताफीने ताब्यात घेतल त्यांचे नाव १) आकाश शंकर जाधव, वय २४ वर्ष, रा.टॉवर लाईन, चिखली, मु.पत्ता. कोळसुर, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद २) आशुतोष नानासाहेब घोडके, वय २३ वर्ष रा. गुरुदत्त हौ.सोसायटी, त्रिवेणीनगर, टॉवलाईन, चिखली प्रमाणे असुन त्यांच्या ताब्यात मिळून आलेली दुचाकी मोटार स्कुटी बाबत अधिक तपास केला असता सदरची मोटार स्कुटी ही देहूरोड पोलीस स्टेशन गुरनं. ३४७/२०२४ कलम ३०३(२) भारतीय न्याय संहीता या गुन्ह्यातील चोरीस गेल्याची असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना नमुद गुन्यात दिनांक २७/०८/२०२४ रोजी अटक केले. त्यांची अधिक पोलीस कोठडी रिमांड प्राप्त करुन त्यांच्याकडे अधिक कौशल्याने तपास केला असता त्यांनी देहूरोड पोलीस स्टेशन हद्दीव्यतीरिक्त पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अनेक मोटार सायकली चोरी केल्याचे कबुल केल्याने देहूरोड पोलीस ठाण्याचे तपास पथक यांनी वरिष्ठांच्या परवानगीने नागझरी, ता. जि.बीड येथुन तपास करून चोरी केलेल्या २१ मोटर सायकली त्यांची एकुण १४,४५,०००/- रुपये किंमतीच्या जप्त करून करुन खालील २१ मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
1) देहूरोड पो स्टे. गुरनं. ३४७/२०२४ बीएनएस कलम ३०३ (२)
२) देहूरोड पो.स्टे.गु.रजि नं ३९०/२०२४ बीएनएस क. ३०३(२)
3)चिखली पोस्टेगुरनं. २८९/२०२४ भादंवि कलम ३७९
४) चिखली पोस्टेगुरनं. २४४/२०२४ भादंवि कलम ३७९ ५) चिखली पोस्टेगुरनं ३१४/२०२४ मादंवि कलम ३७९
६) चिखली पो.स्टे.गु.र.नं.१८५/२०२४ भादंवि कलम ३७९
७) चिखली पो.स्टे.गु.र.नं.५०६/२०२४ भादंवि कलम 379
८) चिखली पोस्टेगुरनं. १७४/२०२४ भादंवि कलम ३७९
9) चिखली पोलीस स्टेशन गुरनं. ४५०/२०२४ बी.एन.एस. कलम ३०३(२)
१०) भोसरी एमआयडीसी पोस्टेमगुरनं २४६/२०२४ मार्चविंक ३७९
११) भोसरी एमटीसी पोरस्टेगुरनं ३७०/२०२४ वीएनएसक ३०३ (२)
१२) भोसरी एमआयडीसी पोस्टेगुरनं. १५७/२५ भादंविक ३७९
१३) निगडी पो.स्टे. गु.र.नं.३२८/२०२४ भादंवि कलम ३०९
१४) निगडी पोस्टेगुरनं. २७६/२०२४ भादंवि कलम ३७९
१५) निगडी पो.स्टे.गु.र.नं.११५/२०२४ भादंवि कलम ३७९
१६) निगडी पो.स्टे.गु.र.नं.३८७/२०२४ बीएनएस क ३०३ (२)
१७) भोसरी पोस्टेगुरनं. २५७/२०२४ भादंवि कलम ३७९ १८) भोसरी पो.स्टे.गु.र.नं.२०५/२०२४ भा .दं.वि. कलम ३७९
१९) दिघी पो.स्टे.गु.र.नं. १०३/२०२४ भादवि कलम ३०९
२०) चिंचवड पोस्टे गु.र.नं २९२/२०२४ बी.एन.एस.क. ३०३(२)
२१) सिंहगड पोस्टे गु.र.नं.४४७/२०२४बीएनएस क ३०३(२)
नमुद आरोपी दिनांक 05/09/2024 रोजी पर्यंत पोलीस कोठडीत असुन त्यांची अधिक पोलीस कोठडी रिमांड प्राप्त करुन देहूरोड पोलीस अधिक तपास करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त सॊ , श्री. विनयकुमार चौबे सो, मा. पोलीस सह आयुक्त श्री. शशीकांत महावरकर मा. अपर पोलीस आयुक्त श्री. वसंत परदेशी , मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ-2 विशाल गायकवाड सो, मा. सहायक पोलीस आयुक्त, देहुरोड विभाग श्री. देवीदास घेवारे सो . वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय वाघमारे यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पोनि गुन्हे विजयकुमार वाकसे , तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सोहन धोत्रे , पोलीस उपनिरीक्षक अजयकुमार राठोड, पोलीस अंमलदार बाळासाहेब विधाते , सुनिल यादव, प्रशांत माळी, केतन कानगुडे, संतोष महाडीक, युवराज माने, शुभम बावनकर, कैलास उल्हारे, खंडू विरणक, मंगेश लोखंडे यांनी सदरची उल्लेखनीय कामगिरी केली आहे