*कुंडमळ्यात पाण्याच्या प्रवाहात पडून दोघांचा मृत्यू*

SHARE NOW

मावळ :

Advertisement

इंदोरी जवळील कुंडमळ्यात वेगाने वाहणा-या पाण्याच्या प्रवाहात वाहत जावून दोघांचा मृत्यू झाला आहे.रोहन ज्ञानेश्वर ठोंबरे (वय-२२)रा.चिंचवड श्रेया सुरेश गावडे(वय-१७)रा.चिंचवड हे गुरुवारी(दि.०५)मित्रांसोबत कुंडमळा येथे फिरावयास आले होते.सेल्फीच्या नादात श्रेया पाण्यात पडली तिला वाचविण्यासाठी रोहन पाण्यात उतरला दोघांचाही वेगाने वाहत जाणा-या पाण्याच्या प्रवाहात वाहत जावून मृत्यू झाला.रोहन एका खाजगी कंपनीत नोकरीस होता श्रेया ११वी मध्ये शिकत होती.रोहनचा मृतदेह गुरुवारी (दि.०५)दुपारच्या सुमारास मिळाला.श्रेयाचा मृतदेह शनिवारी(दि.०७)सकाळच्या सुमारास मिळाला.याकामी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे आणि आपदा मित्रचे निलेश गराडे,अनिल आंद्रे,भास्कर माळी,विनय सावंत,गणेश गायकवाड,राजेंद्र बांडगे,रवी कोळी,शुभम काकडे,सत्यम सावंत,मनिश गराडे,राजू सय्यद यांनी परिश्रम घेतले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page