सलग तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुवर्णपदकाची करामत! किवळ्याची सिद्धी गुरव भारताच्या रोइंग विश्वात पुन्हा चमकली

SHARE NOW

देहूरोड:

आदर्श नगर, किवळे येथील कुमारी सिद्धी माधव गुरव हिने रोइंग या कठीण आणि जलद गतीच्या खेळात सलग तिसऱ्या वर्षी राष्ट्रीय सुवर्णपदक पटकावत महाराष्ट्राचा मान अभिमानाने उंचावला आहे. सिद्धीच्या या ऐतिहासिक यशानंतर किवळे व परिसरात कौतुकाचा वर्षाव होत आहे.

शिक्षक दांपत्याची कन्या असलेली सिद्धी आकुर्डी येथील म्हाळसाकांत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विज्ञान शाखेची अकरावीची विद्यार्थिनी आहे. दापोडी येथील केंद्रीय सैन्य अभियंता महाविद्यालयातील (सीएमई ) रोइंग प्रशिक्षण केंद्रात ती सातत्याने सराव करून स्वतःला सिद्ध करत आहे.

Advertisement

 

भोपाळ येथे झालेल्या ४५व्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ( जेडब्ल्यू४एक्स ) गटात सिद्धी, ईश्वरी फापळ, आरुषी बरार आणि शिवरानी कटेरिया यांच्या चमूने मध्य प्रदेश, केरळ आणि मणिपूरसारख्या दिग्गज राज्यांना मागे टाकत प्रबळ कामगिरी नोंदवली. या संघाचा अविभाज्य घटक म्हणून सिद्धी हिने यावर्षीही सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

 

याआधीही तिची जिद्द कायम राहिली आहे. गतवर्षी गोरखपूर येथे झालेल्या स्पर्धेत दुसऱ्यांदा सुवर्णपदक मिळवले होते, तर हैदराबादमध्ये झालेल्या सब-ज्युनिअर राष्ट्रीय स्पर्धेत तिने चमकदार विजय मिळवून पहिले सुवर्ण पटकावले होते.

 

सिद्धीच्या या सलग तिहेरी सुवर्णकामगिरीनंतर

विकासनगर, किवळे व आदर्श नगर परिसरात अभिमान, आनंद आणि अभिनंदनांचा वर्षाव सुरू आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page