घोरवाडेश्वर परिसरास अपवित्रतेचे ग्रहण? भाविकांचा प्रशासनाकडे आक्रोश

SHARE NOW

शेलारवाडी (मावळ): तळेगाव–देहूरोड परिसरातील घोरवाडेश्वर डोंगर हे वारकरी संप्रदायाचे पवित्र तीर्थस्थान, संत तुकाराम महाराजांच्या अभंगांची प्रेरणभूमी आणि प्राचीन बौद्ध लेण्यांचे वारसस्थान म्हणून ओळखले जाते. भगवान शंकर व माता अमरदेवी यांच्या दर्शनासाठी वर्षभर भाविकांची वर्दळ असते. महाशिवरात्रीच्या सप्ताहात लाखो भक्तांनी नटलेल्या या परिसरावर मात्र गेल्या काही काळात अवांछित व्यापाराचे सावट पडू लागल्याची तीव्र खंत स्थानिक व भाविकांनी व्यक्त केली आहे.

 

डोंगराच्या पायथ्याशी बेकायदेशीर दारूविक्री केंद्रे, मटण खानावळी तसेच संशयास्पद हालचालींशी संबंधित लॉज चालू असल्याचे अनेकांनी निदर्शनास आणले. या पार्श्वभूमीवर परिसराला “रेड लाइट एरिया”सारखी नकारात्मक ओळख मिळत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. दर्शनासाठी येणाऱ्या महिलांना वाहतुकीची प्रतीक्षा करताना गैरसोयीच्या नजरा आणि अवांछित वर्तनाचा त्रास सहन करावा लागत असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या.

Advertisement

 

स्थानीयांच्या मते, ओळखपत्राशिवाय दिल्या जाणाऱ्या खोल्या, खुलेआम फिरणाऱ्या वैश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांचा वावर आणि नागरी वस्तीमध्ये दिसणाऱ्या विचित्र हालचालींमुळे असुरक्षिततेचे वातावरण तयार झाले आहे. याचा परिणाम म्हणून काही तरुण व्यसनाधीनतेकडे झुकल्याची, तर दारूमुळे झालेल्या अपघातांत मृत्यू व अपंगत्वाची उदाहरणे वाढल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली.

 

आगामी १५ फेब्रुवारीच्या महाशिवरात्री सप्ताहापूर्वी सर्व बेकायदेशीर व्यावसायिकांवर कडक कारवाई करून परिसर शुद्ध व सुरक्षित करावा, अशी एकमुखाने मागणी भाविकांनी केली आहे .घोरवाडेश्वरचे पावित्र्य जपणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे,” असे मत अनेकांनी नोंदवले आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page