*देहूत ‘भक्तीरस तुकोबांचा’* दिवाळी पहाट संगीत महोत्सवात स्वरांची दिव्य आराधना; गायिका काजल भेगडे यांच्या सुरेल गायनाने भारावली देहू नगरी

SHARE NOW

देहूगाव :

भाऊबीजेच्या मंगलप्रसंगी पवित्र श्रीक्षेत्र देहू येथे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने ‘दिवाळी पहाट संगीत महोत्सव – स्वरात्मिका प्रस्तुत भक्तीरस तुकोबांचा’ हा सुरेल कार्यक्रम मोठ्या भक्तिभावात आणि आध्यात्मिक वातावरणात पार पडला.

 

संत तुकोबांच्या मुख्य मंदिरातील सुवर्णप्रभाती, सकाळच्या शांत वातावरणात गायिका काजल भेगडे (संगीत विशारद) यांच्या मधुर आणि भावपूर्ण स्वरांनी संपूर्ण परिसर भक्तिरसाने ओतप्रोत भरून गेला. त्यांच्या सुरेल सादरीकरणाने उपस्थित श्रोते जणू तुकोबांच्या नामस्मरणात तल्लीन झाले. प्रत्येक राग, प्रत्येक आलापातून तुकोबांच्या अभंगांचे दैवी दर्शन घडत होते.

Advertisement

 

मृदंग-तबल्याच्या तालावर सुरांचा सोहळा

 

या कार्यक्रमाला साथसंगत लाभली होती मृदंगावर ह.भ.प. भिमराव हांडे आणि तबल्यावर ह.भ.प. अजित लोहर यांच्या अप्रतिम तालसंवेदनाची. त्यांच्या तालांच्या संगतीत काजल भेगडे यांच्या स्वरांनी भक्तिरसाची आरती जणू तुकोबांच्या चरणी अर्पण केली.

 

भक्ती, संगीत आणि दिवाळीच्या प्रकाशाचा संगम

 

दिवाळीच्या तेजोमय सकाळी देहू नगरी तुकोबांच्या नामगजराने गुंजून गेली होती. दीपांच्या प्रकाशात, धूपाच्या सुवासात आणि संतवाणीच्या स्वरात न्हाऊन निघालेल्या या पहाटेने सर्व श्रोते मंत्रमुग्ध झाले. ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा गजर आणि संगीताचे दिव्य सूर यांचा संगम घडवत हा कार्यक्रम भक्ती आणि संस्कृतीचा एक अविस्मरणीय अनुभव ठरला.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page