श्रीमंत सरदार सत्यशील राजे पद्मसेन राजे दाभाडे सरकार यांच्यावतीने तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नूतन वास्तूमध्ये उभारण्यात येणाऱ्या ऐतिहासिक कलादालनास श्रीमंत सरदार सरसेनापती विजयसिंहराजे, राजे – यशवंतराव दाभाडे यांचे नाव देण्याची मागणी
तळेगाव दाभाडे :
काही दिवसापूर्वी सरसेनापती उमाबाईसाहेब दाभाडे सेवा प्रतिष्ठान, तळेगाव दाभाडे यांनी तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नूतन वास्तूमध्ये ऐतिहासिक कलादालन उभे राहावे यासाठी आमदार सुनील (अण्णा) शेळके यांना निवेदन दिले होते.
या ऐतिहासिक कलादालनामध्ये श्रीमंत सरसेनापती दाभाडे राजघराण्याचा इतिहास तसेच तळेगाव दाभाडे संस्थांचा इतिहास तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये येणाऱ्या व्यक्तींना पाहता येईल.
त्याच अनुषंगाने या ऐतिहासिक कलादालनाला संस्थान काळातील तळेगाव दाभाडे संस्थांच्या गादीवरील शेवटचे राजे श्रीमंत सरदार सरसेनापती विजयसिंहराजे
राजे – यशवंतराव दाभाडे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी श्रीमंत सरदार सत्यशील राजे पद्मसिंह राजे दाभाडे सरकार यांनी आमदार सुनील आण्णा शेळके यांना रविवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी निवेदन देऊन केली आहे. यावेळेस श्रीमंत राजमाता वृषाली राजे दाभाडे यादेखील उपस्थित होत्या.