*कृष्णराव भेगडे शाळेत मुलींनी मारली बाजी*
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे स्टेशन भागातील कृष्णराव भेगडे इंग्लीश स्कुलने निकालाची उज्वल परंपरा कायम ठेवत शाळेचा निकाल शंभर टक्के लागला. यामध्ये वरदायिनी डाळिंबकर हिने ९४.२० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला, नेहा मराठे हिने ९३.४० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला. हिंदवी ढोरे हिने ९३.२० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला. विद्यार्थी विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत पास झाले, तर त्यातील १७ विद्यार्थी प्रथम श्रेणीतून पास झाले संस्थेचे संस्थापक चंद्रकांत काकडे, संस्थेचे अध्यक्ष संदीप काकडे काकडे, संस्थेच्या संचालिका गौरी काकडे , शाळेच्या मुख्याध्यापिका मीना अय्यर शाळेचा पर्यवेक्षिका ज्योती सावंत आणि कीर्ती कुलकर्णी या सर्वांनी यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.