एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयात १३ व्या वार्षिक संशोधन विज्ञानपरिषदेचे आयोजन

SHARE NOW

तळेगाव दाभाडे

गुरुवार दिनांक १८ डिसेंबर व शुक्रवार दिनांक १९ डिसेंबर २०२५ रोजी माईर एम.आय. टी. पुणेचे एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयात १३ व्या वार्षिक संशोधन विज्ञानपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

 

या दोन दिवसीय परिषदेचा विषय होता “माईंड ,मूव्हमेंट ,मेडिकेशन : ऎन इंटिग्रेटेड अँप्रोच टू हीलिंग “ या परिषदेच्या उद्घाटन सत्राचे प्रमुख पाहुण्या आणि प्रमुख वक्त्या भारताच्या प्रमुख मानसोपचार तज्ज्ञ प्रोफेसर डॉ. हेनल शाह ह्या होत्या . या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालयाच्या वैद्यकीय कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा नागरे आणि कार्यकारी संचालक डॉ. विरेंद्र घैसास , प्राचार्या डॉ. दीपा नायर आणि आयोजक अध्यक्ष डॉ. अनीश भट , डॉ. गणेश पेंटेवार आणि डॉ. संतोष बोरकर उपस्थित होते. आपल्या मुख्य भाषणात प्रमुख पाहुण्या डॉ. हेनल शाह यांनी “न्यूरोप्लास्टिसिटी अँड रेसिलियन्स: द ब्रेन्स रोल इन फिसिकल अँड इमोशनल रिकव्हरी” या विषयाबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यांनी न्यूरोप्लास्टिसिटी आणि मानसिक लवचिकतेचे महत्त्व स्पष्ट केले आणि न्यूरोप्लास्टिसिटी आणि मानसिक लवचिकता कशी सुधारायची हे स्पष्ट केले.

 

डॉ.सुचित्रा नागरे यांनी निरोगी आयुष्य जगण्यासाठी संतुलित मानसिक आणि शाररिक आरोग्य याचे महत्व व्यक्त केले. तसेच डॉ. हेनल शाह यांच्या सोबत मावळ विभागातील ग्रामीण जनतेच्या मानसिक विकाराचे निदान व उपचार करण्यासाठी भविष्यात काम करण्याची ईच्छा दर्शवली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुषमा शर्मा यांनी केले.

 

या परिषदेत विविध सत्रांमध्ये नामवंत वक्ते उपस्थित होते. सुप्रसिध्द सर एच. एन. हिरानंदानी हॉस्पिटलचे अडडिशनल डायरेक्टर डॉ. अर्जुन ढवळे यांनी “अँप्रोच टु बॅकऐक” बद्दल सविस्तर माहिती दिली. डॉ.जयश्री दवणे, भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजच्या फार्माकोलॉजि विभागाच्या प्रोफेसर यांनी “पिल्स, पेन ,पर्सेपशन : अ मल्टिडिसिप्लिनरी अँप्रोच टु रॅशनल फार्माकोथेरपी ” या विषयावर भाष्य केले.

Advertisement

 

या विज्ञान परिषदेच्या दुसऱ्या दिवशी सुप्रसिध्द मानसोपचार तज्ञ डॉ. धनंजय अष्ठुरकर यांनी उत्तम शाररिक आरोग्यासाठी मानसिक आरोग्याचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच फार्माकॉलॉजि प्रोफेसर डॉ. दीपक लंगडे यांनी “रोल ऑफ ए. आय. इन नेक्स्ट जनरेशन ड्रग डिलिव्हरी” या विषयी माहिती देत वैद्यकीय क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचे व कृत्रिम बुद्धिमत्तेचे महत्व सांगितले.

 

तसेच या विज्ञान परिषदेत “फ्रॉम इन्फ्लामेशन टु रिहॅबिलिटेशन : ब्रिजिंग जॉईंट माईंड अँड मेडिसिन इन रहयूमॅटॉइड अर्थराइटिस ” या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते . त्यामध्ये सुप्रसिध्द अस्थिरोगतज्ञ् डॉ. शैलेश रत्नपारखी , रहयूमॅटोलॉजिस्ट डॉ. सुशांत शिंदे, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. स्मिता पानसे आणि भौतिक उपचार तज्ज्ञ डॉ.अजीत दाभोळकर यांनी सहभाग घेतला होता . या चर्चासत्राचे सूत्रसंचालन मानसोपचार विभाग प्रमुख डॉ. अनीश भट यांनी केले.

 

डॉक्टर्स, पदव्युत्तर विध्यार्थी आणि एमबीबीएस विध्यार्थी यांनी या वैद्यकीय संशोधन कार्यशाळेमध्ये जवळपास १०० वैज्ञानिक पेपर आणि पोस्टर चे सादरीकरण केले.

 

विविध श्रेणीतील सर्वोत्कृष्ट पेपर व पोस्टर यांना पारितोषिक देण्यात आली. या परिषदेत जवळपास ४०० डॉक्टरांनी सहभाग घेतला होता .

 

डॉ. दीपा नायर , प्राचार्या एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालय यांनी समारोपाचे भाषण केले आणि सर्व वक्ते व पॅनल चे आभार मानले . डॉ.संतोष बोरकर यांनी सर्वांचे आभारप्रदर्शन केले.

 

मानसोपचार विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ. अनीश भट, प्राध्यापक डॉ. आशिष उभाळे ,डॉ.आशिष आर्य, डॉ स्वाती मगरे, डॉ.कर्मण्य वाटवानी व इतर , औषधशात्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ. गणेश पेंटेवार, प्राध्यापक डॉ.अपर्णा चिंचोलकर , प्राध्यापक डॉ.प्रसन भंडारी व इतर ,अस्तिरोग विभाग प्रमुख डॉ. संतोष बोरकर , डॉ. मानस पुसाळकर , डॉ. शिवराज कोंडे, डॉ.राजीव मुंढे व इतर यांनी १३ व्या वार्षिक संशोधन विज्ञान परिषदेचे उत्तमरित्या आयोजन केले त्याबद्दल संस्थेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दर्पण महेशगौरी, समन्वयक डॉ. तुषार खाचणे, प्राचार्या डॉ. दीपा नायर , कार्यकारी संचालक डॉ. विरेंद्र घैसास व कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा नागरे यांनी सर्वांचे कौतूक केले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page