मुळशीतील बाबूजी…मा. नंदकुमार वाळंज यांना The Pride of Maharashtra अर्थात:- “महाराष्ट्राचा अभिमान” पुरस्कार देऊन गौरविले…
पनवेल :
पनवेल येथे मा. श्री. नंदकुमार सोनू वाळंज यांना आदर पूर्वक पुरस्कार देताना आयोजकांनी त्यांच्या कार्याबद्दल व्यासपीठावरून गौरव उदगार काढले.ते म्हणाले…आई – वडिलांचा समाजकार्याचा वारसा बाबूजीनी चालवायला सुरु केला.आणि नंदा.. पासून चा हा प्रवास जेष्ठ समाजसेवक होई पर्यंत चालू आहे. सर्वच लोक आदराने त्यांना बाबूजी म्हणत…
बाबूजी.. यांनी मुळशी मावळ भागात मंदिर उभारणीत, विविध शाळेत भौतिक सुविधा देन्यात, पत्रकार भवन ची निर्मिती, आळंदी देहू पंढरपूर येथील धर्मशाला निर्मिती, वडिलांच्या नावे 2001 साली कोराईगड शिक्षण संस्था स्थापन केली आणि सोनू अनाजी वाळंज माध्यमिक शाळा काढून दुर्गम भागातील 25 गावाचा शिक्षणाचा प्रश्न सोडवला. कित्येक वर्षा पासून ते उत्तम उपचारासहीत महा आरोग्य शिबिराचे भव्य आयोजन करत.. आता पर्यंत 10 हजारावर लोकांनी शिबिरातून आरोग्यविषयक लाभ घेतला.,नदी स्वछता अभियानात सक्रिय सहभाग नोंदवला., अनेक बालकांच्या व वृद्धाश्रमात सर्वोत्तम मदत केली, बाबुजींच्या योगदाणामुळे लोणावळा शेजारी सहारा उद्योग समूह आहे.स्व. सुब्रतो रॉय यांच्या कल्पनेतील सहारा सिटी हा पृथ्वी वरील स्वर्ग निर्माण केला त्यामुळे हजारो स्थानिक भूमिपुत्रांना नौकरी मिळाली. यामुळे दुर्गम भागातील जनतेचे जीवन सुविधानीं संपन्न झाले.
अश्या उत्तुंग कार्याबदल त्यांना पनवेल येथे “महाराष्ट्राचा अभिमान” या पुरस्काराने गौरविले..
बाबूजी, नेहमी म्हणतं मी काहीच करत नाही. करता करविता परमेश्वर माझ्या हातून करवून घेत असतो.
माणसामध्ये आपल्या कडे जे काही त्यातून समाजासाठी काहीतरी देण्याची वृत्ती आपल्या मध्ये असायला हवी. देश, धर्मा साठी दिलेलं आपल्याला कोणत्याना कोणत्या रूपाने आपल्या ला आशिर्वाद स्वरूपात भेटत राहत…
सौ वत्सला वाळंज ह्या त्यांच्या पत्नी त्याही आंबवणे गावच्या माजी आदर्श सरपंच होऊन गेल्या. त्यांचा मोठा मुलगा मिलिंद, लहान मुलगा सागर हे आपल्या उद्योग व्यवसायात मग्न आहेत. दोन्ही मुलांच्या कल्पनेतून महाराष्ट्रात कुठेच नाही अश्या कॅनरी आयरल्यांड रिसॉर्ट ची सुरुवात करून दुबई सारख्या अंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम उद्योजक ‘किताब बहाल केला.
मुलगी रोहिणी उत्तम डॉक्टर असून IIMS या सर्व सुविधा युक्त हौस्पिटल मध्ये सेवा देत आहेत.आई कडून मिळालेला वारकरी संप्रदायचा वारसा संभाळून शिक्षण, आरोग्य,रोजगार, निवारा, अन्नदान, या समाजाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याचा बाबूजीनी नेहमीच प्रयत्न केला.
संगीतकार व गीतकार विराग मधुमालती यांनी केलेल्या शिवतांडव स्तोत्रम पठनाने कमी वेळात गायन करून विश्व् विक्रम केला. मुबंई येथे पत्रकार परिषद आयोजन करून या कार्यक्रमाचे बाबूजी स्वतः साक्षीदार होऊन भारतभर प्रसिद्धी मिळाली..
भारतीय डाक विभाग पुणे यांनी आंबवनेत डाक चौपाल चे आयोजन करून बाबुजींचे पोस्ट तिकीट बनवून त्यांना बहाल केले. लोणावळा नगरीत मावळ वार्ता फाउंडेशन च्या माध्यमातून सर्वधर्म समभाव व राष्ट्रप्रेम जोपासले. वारकरी संप्रदायसाठी संत शिरोमणी तुकाराम महाराज यांचा महानाट्य प्रयोग निर्मितीस मोलाचे सहकार्य केले.
त्यांच्या या कार्यामुळे त्यांना आजवर असंख्य पुरस्कार मिळाले.
1)मृदूंग साधना गुरुकुल संस्थेचा जीवनगौरव.
2) साप्ताहिक अंबर चा जीवन गौरव.
3) आंतरराष्ट्रीय विराट संत संमेलनात शंकराचार्य स्वामीनारात्यांनणंदतीर्थ व असंख्य धर्मगुरूंच्या शुभ हस्ते विश्व् जीवन गौरव घेऊन जीवन गौरव पुरस्काराची हॅट्रिक केली.” ऐसी कळवळ्याच्या जाती, करी लाभाविन प्रीती “अर्थात-ज्याच्या मनात दया भाव आहे. कळवळा आहे. तो कुणावरही स्वार्थाशिवाय प्रेम करतो. हे संत वचन बाबूबजींच्या अंगी असलेल्या गुणामुळे त्यांना लागू पडत.
अहो! नेतृत्व, कर्तृत्व, आणि दातृत्व याचा त्रिवेणी संगम म्हणजे बाबूजी!अलीकडेच त्यांना “मावळ भूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे.
आज महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशन. महाराष्ट्र यांच्या वतीने “The pride of Maharashtra”
अर्थात:- “महाराष्ट्राचा अभिमान”
हा नामांकित सन्मान देऊन बाबूजी मा. श्री नंदकुमार वाळंज यांना आदर पूर्वक डॉ सुमिता सातारकर मा. सौ तृप्ती ताई देसाई मा राजीव लोहार मा सौ मनीषाताई लोहार या मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित केले.
वाळंज यांची राजकारण व समाजकारण विविध संस्था यावरील मावळ मुळशीत असलेली पकड व नागरिकांचा त्यांच्या पाठीशी असलेला जनसागर या त्यांच्या कार्या मुळे आदरणीय वाळंज यांना हा बहुमान देताना आम्हाला आनंद होत आहे अस मत मान्यवर व MJF चे आयोजक यांनी व्यक्त केले आहे..
या भूमी पुत्रास मिळालेल्या पुरस्काराने मुळशी खोऱ्यात आनंद व्यक्त केला जात आहे.. समाजातील सर्वच स्तरातून मा नंदकुमार वाळंज यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतं आहे.






