परांजपे विद्यामंदिरात अत्याधुनिक संगणक दालनाचे उद्घाटन — शिक्षणात डिजिटल झेप!
तळेगाव दाभाडे:

नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचलित ॲड. पू. वा. परांजपे विद्यामंदिरामध्ये दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ रोजी अत्याधुनिक संगणक दालनाचे उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मावळ तालुक्यातील प्रख्यात उद्योजक श्री. दत्तात्रय कुडे, तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव श्री. संतोष खांडगे उपस्थित होते. तसेच सदस्य श्री. महेशभाई शहा, श्री. सोनबा गोपाळे, श्री. विनायक अभ्यंकर, शालेय समिती सदस्य अशोक काळोखे, माजी नगरसेविका नीता काळोखे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. पांडुरंग पोटे यांनी केले. या वेळी प्रमुख पाहुणे श्री. दत्तात्रय कुडे आणि श्री. उद्धव चितळे यांच्या माध्यमातून विद्यालयातील नव्या संगणक दालनासाठी साडेचार लाख रुपये किमतीचे फर्निचर देण्यात आले.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना श्री. कुडे म्हणाले, “आजच्या काळातील शाळा या भौतिक सुविधांनी समृद्ध होत आहेत. विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षणासाठी समाजातील प्रत्येक घटकाने हातभार लावला पाहिजे. या संधीचं सोनं करून विद्यार्थ्यांनी देशकार्यात योगदान द्यावं.”
अध्यक्षीय मनोगतात श्री. संतोष खांडगे म्हणाले, “परांजपे विद्यामंदिर ही भौतिक सुविधा आणि गुणवत्तेच्या जोरावर मानांकनास पात्र ठरलेली आदर्श शाळा आहे. विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून स्वतःचे व्यक्तिमत्व अधिक सक्षम करावे.”
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ. रेखा भेगडे यांनी केले. सूत्रसंचालन सौ. प्रभा काळे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संगणक शिक्षिका सौ. कोमल कांबळे, संपत गोडे, दत्तात्रय ठाकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.






