नूर मस्जिदतर्फे वार्षिक जलसा कार्यक्रम मकतबच्या विद्यार्थ्यांचे जोशपूर्ण सादरीकरण
तळेगाव दाभाडे: पु नूर मस्जिद दिनी तालीम विद्यार्थ्यांचा वार्षिक जलसा यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आला. दार-उल-ईमान मकतब मधील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात आपली प्रतिभा मोठ्या उत्साहाने सादर केली. या वेळी विद्यार्थ्यांनी किरआत (कुरआन पठण), नात (इस्लामिक कविता), व्याख्याने आणि हम्द यांचे सुंदर सादरीकरण केले, ज्यामुळे उपस्थित प्रेक्षक भारावून गेले.
हाफिज शाहिद सिकिलकर यांनी विद्यार्थ्यांना उत्कृष्ट प्रशिक्षण देऊन त्यांची तयारी परिपूर्ण केली. या कार्यक्रमात मुलांसोबत मुलींचीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती, ज्याचे विशेष कौतुक करण्यात आले. यावर्षी मकतब मधील पाच विद्यार्थ्यांनी संपूर्ण कुरआन पठण पूर्ण करण्याचा मान मिळवला.
परीक्षांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तसेच शिस्त, चांगली वागणूक व नियमित उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी व इतर बक्षिसांनी गौरविण्यात आले. उपस्थित प्रेक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे मनःपूर्वक कौतुक केले. आयम्मा हजरात व विशेष अतिथींच्या हस्ते सर्व पुरस्कार वितरित करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात पवित्र कुरआन पठणाने झाली. उपस्थित मान्यवरांमध्ये नूर मस्जिदचे अध्यक्ष अय्युब शिकीलकर, खजिनदार नदीम शेख, ट्रस्टी औरंग सादुले आणि इरफान जमादार यांचा समावेश होता. तसेच मुफ्ती मुख्तार कासमी, मौलाना सिकंदर-ए-आझम, हाफिज अब्दुल कय्युम, हाफिज निसार, मौलाना सलमान आणि हाफिज अस्जद हे विद्वान आणि धार्मिक नेते उपस्थित होते.
विशेष अतिथी म्हणून अब्दुल अजीज शिकीलकर, शाहनूर मुलाणी, शफिक शिकीलकर, डॉ. मोहसीन खान, ॲड. रियाज तांबोळी, निजाम खान, आलम मुल्ला, मुनीर बेग, सोहेल शिकीलकर, साजिद शेख, मन्सूर शाह, एजाज शिकीलकर, सुफियान शिकीलकर, अशरफ नालबंद आणि जावेद शेख यांची उपस्थिती होती. तसेच मोठ्या संख्येने महिला देखील या कार्यक्रमात सहभागी झाल्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इम्रान शेख, जमीर शेख सर, अब्दुल कादिर, इरशाद अंसारी, शाहनवाज टेलर, कलामुद्दीन अंसारी, रमजान आणि बिलाल नदाफ, अब्दुल सत्तार, गौसभाई, समीर शेख, आदिल शेख आणि आबशार खान यांनी विशेष मेहनत घेतली. हा धार्मिक व प्रेरणादायी जलसा दुआ (प्रार्थना) घेतल्यानंतर संपन्न झाला.