सेवापुर्ती म्हणजे नवीन कार्याची सुरुवात – कार्यवाह चंद्रकांत शेटे – इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयातील तंत्रशिक्षण विभागाचे प्रा.निशिकांत भोसले सेवानिवृत्त
तळेगाव दाभाडे :
इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयातील तंत्रशिक्षण विभागाचे प्रा.निशिकांत भोसले यांच्या ३० वर्षांतील शैक्षणिक सेवेतील सेवापुर्ती समारंभ यशोदा महादेव काकडे काॅलेज ऑफ इंजीनियरिंगच्या सभागृहात गुरूवार दि.३१जुलै २०२५ रोजी संपन्न झाला.
याप्रसंगी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे यांनी मनोगतात शुभेच्छा देताना सांगितले की ” सेवापुर्ती समारंभ म्हणजे नवीन कार्याची सुरुवात आहे.पुढील काळात देखील भोसले सरांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देत आरोग्यसंपन्न जीवन जगावे.तसेच पुढील आयुष्यात त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात अशी सदिच्छा व्यक्त केली.
प्राचार्य डॉ.संभाजी मलघे यांनी सांगितले की ” प्रा.निशिकांत भोसले हे विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून परिचित होते.सरांनी घडवलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात नावलौकिक मिळविला आहे.
तसेच अनेक कंपन्यांमध्ये मोठ-मोठ्या पदांवर कार्यरत आहेत.ही सरांच्या शैक्षणिक कार्याची पावती आहे.
यावेळी प्रा.निशिकांत भोसले यांनी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे कार्यवाह चंद्रकांत शेटे कनिष्ठ महाविद्यालय समन्वयक संदिप काकडे तसेच सर्व संस्था पदाधिकारी यांचे आभार व्यक्त करत कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य संदिप भोसले यांनी केले तसेच मनोगत सेवानिवृत्त जेष्ठ प्राध्यापक साहेबराव गावडे,प्रा.मगन ताटे,प्रा.वसंत पवार,माजी उपप्राचार्य सुनिल ओव्हाळ, प्रा.प्रतिभा गाडेकर प्रा.मोहन कडू इंजिनियरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ.साहेबराव पाटील,फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय आरोटे विज्ञान विभागाचे प्रमुख प्रा. उत्तम खाडप इंद्रायणी वरिष्ठ महाविद्यालयातील प्रा.राजेंद्र आठवले तंत्रशिक्षण विभागातील अश्विनी गोखले मॅडम प्रा.योगेश घोडके माजी विद्यार्थी वैभव कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संभाजी मलघे उपप्राचार्य संदिप भोसले तसेच गोरख काकडे पर्यवेक्षिका प्रा.उज्वला दिसले तसेच कला,वाणिज्य,विज्ञान व तंत्रशिक्षण विभागातील सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच निशिकांत भोसले यांच्या पत्नी प्रा.सुनीता भोसले मुलगी डॉ. निमिषा भोसले तसेच जावई डॉ.अक्षय पवार तसेच आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.आर.आर.डोके यांनी केले तर आभार व्ही.डी.खेडकर यांनी मानले.






