इंद्रायणी डी . फार्मसी महाविद्यालयाला राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा प्रतियोगीतेत प्रथम पारितोषिक
मावळ पुणे : इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे इंद्रायणी इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी (डी. फार्मसी) तळेगाव दाभाडे महाविद्यालयाने नुकत्याच डॉ. डि. वाय. पाटील कॉलेज ऑफ़ फार्मसी, आकुर्डी येथे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्य स्तरीय तांत्रिक प्रश्नमंजुषा प्रतियोगिता २०२४ या राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला . इंद्रायणी फार्मसी महाविद्यालयातील द्वितीय वर्षातील विद्यार्थी चि. ओंकार पोखरकर व कु. सानिका दिघे यांना प्रथम क्रमांक म्हणून (रुपये १५००० बक्षीस, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र) देऊन सन्मानीत करण्यात आले. या प्रतियोगीतेचे बक्षीस वितरण समारंभ मा. शाहीद उस्मानी, उपसचिव, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, विभागीय कार्यालय, पुणे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या बक्षीस वितरण समारंभासाठी प्रा. जी. एस. शिंदे (प्राचार्य, इंद्रायणी इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी, तळेगाव दाभाडे ), प्रा. आर. एन. जाधव (प्राध्यापक , इंद्रायणी इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी, तळेगाव दाभाडे ), डॉ. एन. एस. व्यवहारे (प्राचार्य, डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, आकुर्डी पुणे ), डॉ. आशिष चिंबाळकर (विभागप्रमुख, डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी, आकुर्डी पुणे ), डॉ. एस. व्ही. देशपांडे (प्राचार्य, डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी, आकुर्डी पुणे ) आदी उपस्थित होते. विशेष म्हणजे या राज्यस्तरीय प्रतियोगीतेमध्ये संपूर्ण राज्यातून जवळपास ४० डी फार्मसी महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता.
इंद्रायणी डी फार्मसी महाविद्यालयांच्या या दैदीप्यमान मिळालेल्या यशासाठी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. रामदासजी काकडे, कार्यवाह मा. श्री. चंद्रकांत शेटे, सदस्या व मार्गदर्शिका सौ. निरुपा कानिटकर, खजिनदार मा. श्री. शैलेश शहा, सर्व विश्वस्त प्राचार्य प्रा.जी. एस. शिंदे, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांतर्फे यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.