अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्यांचे वाटप…. समीर भाऊ चांदेरे यांच्याकडून राधाकृष्ण विद्यालयास चार संगणक भेट.. राधाकृष्ण विद्यालय येथील शालेय मुलांना साहित्य वाटप करून वाढदिवस साजरा..
कोंढवा पुणे:
महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य यांचे वाटप करण्यात आले. राधाकृष्ण प्राथमिक विद्यालय गोकुळ नगर येथील मुलांना साहित्य वाटप करून अजित दादा पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील लहान मुलांना वही पुस्तक पेन कंपास पेटी असे विविध शालेय साहित्य देण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद आणि उत्साह दिसून येत होता.
यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम यांनी सांगितले की अजित दादांच्या वाढदिवसानिमित्त होणारा अनाठायी खर्च टाळून या भागातील गोरगरीब मुलांना शालेय साहित्य वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. लहान मुलांच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य आणि त्यांना होणारा आनंद यातच अजितदादांचा वाढदिवस सार्थकी लागल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
तसेच यावेळी पुणे शहराचे अध्यक्ष समीर बाबुराव चांदेरे यांनी सांगितले की विद्यार्थ्यांना शालेय साहित्य याबरोबर इतर कोणत्याही गोष्टींची भविष्यात कमतरता पडू देणार नाही.
तसेच यावेळी त्यांनी राधाकृष्ण विद्यालयास चार संगणक भेट देण्याचे घोषित केले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात लहान मुलांना संगणक व इतर कौशल्य विकसित करण्यासाठी या संगणकाचा नक्की उपयोग होईल आणि भविष्यात यातून चांगले नागरिक नक्की घडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना राधाकृष्ण विद्यालयातील मुख्याध्यापक श्री नागनाथ काळे यांनी सांगितले की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले, तसेच आमच्या विद्यालयाला समीर भाऊ चांदेरे अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर यांच्या वतीने चार संगणक भेट देण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले मी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पुणे शहर यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि असेच विविध समाज उपयोगी उपक्रम सर्वांनी राबवावे अशी विनंती करतो.
या कार्यक्रमाचे आयोजन दत्तात्रय कांबळे, पैलवान अजय भाऊ साबळे यांनी केले होते.
या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पुणे शहर सर्व पदाधिकारी तसेच नागरीक व राधाकृष्ण विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.