श्री. स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त तळेगाव मध्ये “अखंड नाम जप यज्ञ साप्ताहाचे आयोजन.
तळेगाव दाभाडे :
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित ). सौ. सारिकाताई गणेश काकडे आयोजित श्री. स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्ताने दि.30 एप्रिल ते 06 मे असा अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात समुदा्यिक गुरुचरित्र वाचन, स. 8.30 ते 10.30. पर्यंत राहील. दैनंदिन धार्मिक कार्यक्रम स.7 ते दु.2या वेळेत होतील. स्वामींचा अभिषेक, पूजा, भूपाळी आरती नैवैद्य आरती, विशेष याग आणि विश्रांती. दुपारच्या सत्रात दु.2 ते 5 स्वामी चरित्र व दुर्गा सप्तशांती वाचन. ग्राम अभियानंतर्गत.18 विभागाचे मार्गदर्शन, होईल.सायं 5 ते 5.30. यामध्ये औदुंबरास प्रदक्षिणा घातल्या जातील. सायं.6 वा, नैवैध्य आरती होईल. सायं 6.50 वा नित्यध्यान गितेचा 15 व्या अध्ययाचे व विष्णू सहस्त्र नामाचे वाचन होईल.हे सर्व धार्मिक कार्यक्रम स्वामी समर्थ मंदिरा समोर, समर्थ नगर, डी. पी रोड तळेगाव दाभाडे येथे संपन्न होईल.
अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाचे वेळापत्रक पुढील प्रमाणे हा सप्ताह दि.30 एप्रिल ते o6 मे पर्यंत राहील. या साप्ताहमध्ये सोमवार दी.29 रोजी ग्रामदेवतेचा सन्मान केला जाईल.
यज्ञ भूमीची पूर्व तयारी मंडल मांडणी केली जाईल. मंगळवार दि.30 रोजी मंडल स्थापणेसह अग्नी स्थापना स्थापित देवतेचे दहन होईल. दि.2 मे पासून दि.6 मे पर्यंत दैनंदिन नित्यस्वाहकार होईल.परंतु स्वामी याग, चंडी याग, श्री गीताई याग श्रीरुद्रयाग,, आणि मल्हारी याग, तसेच दि.6 रोजी नित्यस्वाहकार सह बली पूर्णहुती होईल. आणि अखेर दि.6 रोजीसत्यदूत पूजन, व अखंड नाम, जप, यज्ञ सप्ताहाची सांगता होईल. या अखंड नाम जप,यज्ञ सप्ताहाचे आयोजक आहेत सौ. सारिकाताई गणेश काकडे. स्वामी समर्थ सेवा केंद्र.. या कार्यक्रमाचे ठिकाण आहे, श्री. स्वामी समर्थ मंदिर समोर, समर्थ नगर, डी. पी. रोड. तळेगाव दाभाडे..