तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील अनाधिकृत फ्लेक्स/बॅनर्स/होडींग्स/फलक/पोस्टर्स बाबत महत्त्वाची सूचना जाहीर

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील अनधिकृत फ्लेक्स, बॅनर्स, होर्डिंग्स, फलक, पोस्टर्स यावर नियंत्रण ठेवण्यासाठी व निष्कासन कारवाईसाठी निम्नलिखित मानक कार्यपद्धती (SOP) लागू करण्यात आलेली आहे.

१. जागा निश्चिती: तात्पुरत्या जाहिराती उभारण्यासाठी आवश्यकतेनुसार स्थानांची निश्चिती केली आहे. यासाठी शुल्काचे निर्धारण संबंधित ठरावानुसार केलेले आहे. संबंधित तात्पुरत्या जाहिराती उभारण्यासाठी अर्ज व शुल्क भरण्याची प्रक्रिया ‘mahaulb.in’ या संकेतस्थळावर केली जाऊ शकते.

२. परवानगी प्रक्रिया: तात्पुरत्या जाहिरातींच्या परवानगीसाठी अर्ज online प्रणालीद्वारे तळेगाव दाभाडे नगरपरिषदकडे सादर करावा लागेल. अर्ज सादर केल्यानंतर ते मंजूर झाले असल्यास ऑनलाइन पैसे भरले जाऊ शकतात. नंतर नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त होईल.

३. निष्कासन कारवाई: अनधिकृत फ्लेक्स/बॅनर्स/होडींग्स/फलक/पोस्टर्स बाबत तळेगाव दाभाडे नगरपरिषद व पोलिस विभाग यांच्या संयुक्त कारवाईतून अनधिकृत होर्डिंग्सचे निष्कासन केले जाईल. संबंधित फलक धारकावर महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध करणारा कायदा लागू करून कारवाई केली जाईल.

४. नियमबाह्य होडींग्स निष्कासन: नगरपंचायती क्षेत्रातील नियमबाह्य आकार व उंचीचे होडींग्स त्वरित निष्कासित केले जातील.

५. QR कोड लावणे: परवानगी प्राप्त जाहिरातींवर अर्जदाराचे नाव, परवानगी क्रमांक, परवानगी कालावधी व ठिकाण असणारा QR कोड लावणे अनिवार्य आहे.

Advertisement

६. तक्रार निवारण यंत्रणा: तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील अनधिकृत फ्लेक्स/बॅनर्स/पोस्टर्स बाबत तक्रार नोंदवण्यासाठी https://talegaondabhademc.org संकेतस्थळावर किंवा टोल फ्री नंबर १८००२३३२७३४, व्हॉट्सअ‍ॅप नंबर ९८९०६१६०८९ वर संपर्क साधा.

७. कार्यवाहीसाठी पोलिस संरक्षण: अनधिकृत होर्डिंग्सच्या निष्कासनासाठी पोलिस विभाग पुरेसे संरक्षण प्रदान करेल, आणि आवश्यकतेनुसार हत्यारबंद पोलिस दल देखील उपलब्ध करून दिले जाईल.

८. प्लास्टिक व अविघटनशील पदार्थांचा वापर: कारवाईत अनधिकृत होर्डिंग्स, फ्लेक्स, बॅनर्स व पोस्टर्समधील प्लास्टिक व अविघटनशील पदार्थांचा वापर कमी करण्यावर लक्ष ठेवले जाईल.

९. न्यायालयाचे आदेश: उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व राजकीय पक्षांना अनधिकृत होर्डिंग्स, फ्लेक्स, बॅनर्स व पोस्टर्स न उभारण्याची सूचना देण्यात आली आहे.

१०. नियमानुसार कार्यवाही: महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध करण्यासाठी अधिनियम, १९९५ च्या तरतुदींचे पालन करून आवश्यक कारवाई केली जाईल.

११. स्ट्रक्चरल ऑडिट: दीर्घकालीन होर्डिंग्ससाठी स्ट्रक्चरल ऑडिट आवश्यक असणार असून ते वेळोवेळी केले जाईल.

महत्त्वाची सूचना:

फ्लेक्स/होर्डींग्स/बॅनर्स/पोस्टर्स बाबत इतर माहिती व सूचना ‘mahaulb.in’ व ‘talegaondabhademc.org’ वर उपलब्ध आहेत.

तळेगाव दाभाडे नगरपरिषद अंतर्गत अधिकृत परवानगी व निष्कासन प्रक्रियेचे पालन करणे आवश्यक आहे.

मुख्याधिकारी

तळेगाव दाभाडे नगरपरिषद

(विजयकुमार सरनाईक)


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page