मिलिंद भागवत यांनी घेतला News18 लोकमतचा निरोप, सामाजिक क्षेत्रात काम करण्याचा निर्णय
मुंबई –
गेल्या 25 वर्षांपासून टेलिव्हिजनच्या स्क्रीनवर सातत्याने दिसणारा आणि प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवणारा लोकप्रिय चेहरा मिलिंद भागवत यांनी News18 लोकमतचा निरोप घेतला आहे. टेलिव्हिजनमधील आपल्या प्रदीर्घ प्रवासाला विराम देत आता ते सामाजिक कार्यात सक्रिय होणार आहेत.
मिलिंद भागवत यापूर्वी एबीपी माझामध्ये अनेक वर्षे कार्यरत होते. रात्री 10 च्या बातम्या सादर करणारे आणि त्या साठी विशेष प्रसिद्ध असलेले मिलिंद भागवत शांत, संयमी आणि स्पष्टवक्ते अँकर म्हणून प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण करू शकले.
25 वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीत मिलिंद भागवत यांनी पत्रकारितेत अनेक महत्वपूर्ण भूमिका पार पाडल्या. त्यापैकी 10 वर्षं News18 लोकमत मध्ये होते. हा काळ त्यांच्या सहकाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरल्या. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना “अतिशय साधा माणूस, संवेदनशील पत्रकार आणि मदतीला नेहमीच तयार असलेला बाॅस” म्हणून ओळखलं.
मिलिंद भागवत यांच्या पत्रकारितेतील कार्याबद्दल आणि त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील नवीन प्रवासासाठी सहकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या नव्या वाटचालीला मन:पूर्वक शुभेच्छा!