उर्से येथे शेतकऱ्यांना रोपांचे वाटप

SHARE NOW

उर्से: जय जवान, जय किसान शेतकरी राजा ग्रुप मावळ

Advertisement

तालुका यांच्या संकल्पनेतून पवन मावळ भागातील शेतकऱ्यांना झाडे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. या ठिकाणी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती नियोजनबद्ध करून आपले उत्पन्न कसे वाढवावे, याविषयी कृषी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रम भारतीय किसान संघाचे अध्यक्ष विश्वनाथ शेलार यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या कार्यक्रमामध्ये देवराई संस्थचे संस्थापक सुकन बाफना, माजी सभापती संतोष कुंभार, राजाराम असवले यांनी मार्गदर्शन केले. पुढील काळामध्ये वृक्षलागवड करण्यासाठी मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना झाडे वाटप करणार असल्याने सांगितले. सेंद्रिय शेती नियोजन व वृक्षाचे आपल्या जीवनातील महत्त्व याबाबत सखोल माहिती प्रधानमंत्री जनकल्याण योजना कोकण प्रांत अध्यक्ष सचिन पालांडे व सेंद्रिय शेती कृषितज्ञ विकास देशमुख यांनी दिली. कार्यक्रमाचे आयोजक सुभाष धामणकर यांनी स्वागत केले. आभार हभप गणपत पवार यांनी मानले. या वेळी संतोष येवले, शंकर गायकवाड, गुलाब घारे, खंडू धामणकर, बाळासाहेब पिसाळ, विविध गावातील शेतकरी उपस्थित होते.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page