“ओ. पी. नय्यर यांच्या सुरांनी भारली तळेगावची संध्याकाळ!” “कराओके क्लबच्या कलाकारांकडून सुरेल आदरांजली; रसिक मंत्रमुग्ध”
तळेगाव दाभाडे – श्रीरंग कलानिकेतन संचालित कराओके क्लबने सुप्रसिद्ध संगीतकार ओ. पी. नय्यर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त रंगतदार कार्यक्रम “झंकार” सादर केला.
२४ ऑगस्ट रोजी झालेल्या या कार्यक्रमात “आईये मेहेरबान” पासून ते “ये देश है वीर जवानों का” पर्यंत अनेक लोकप्रिय गाणी रसिकांच्या मनात घर करून गेली.
Advertisement
दीपप्रज्वलनाने सुरुवात झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे प्रा. नितीन फाकटकर, डॉ. अनंत परांजपे, माजी नगरसेवक लक्ष्मण माने, निवेदक संदीप कोकीळ आदी मान्यवर उपस्थित होते.
संपूर्ण संकल्पना ज्योती देशपांडे यांनी मांडली तर सूत्रसंचालन अनघा जोशी यांनी खुमासदार शैलीत केले. क्लबच्या कलाकारांनी मनापासून दिलेला सहभाग आणि सादरीकरणामुळे तळेगावची ही संध्याकाळ सुरेल ठरली.






