इंद्रायणी महाविद्यालयातील प्रा. कृष्णा मिटकर यांना विद्यावाचस्पती पदवी प्रदान…
तळेगाव दाभाडे
इंद्रायणी महाविद्यालय तळेगाव दाभाडे येथे वाणिज्य विभागात कार्यरत असलेले प्रा. कृष्णा धोंडीबा मिटकर यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची विद्यावाचस्पती (पीएच.डी) पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली.
प्रा. मिटकर यांनी वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखांतर्गत ‘महाराष्ट्र शासनाच्या बीज भांडवल योजनेअंतर्गत राष्ट्रीयीकृत बँकांद्वारे करण्यात आलेल्या कर्ज वितरणाच्या विनियोगाचा चिकित्सक अभ्यास’ या विषयावर सखोल संशोधन करून आपला प्रबंध सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला सादर केला होता.
त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या ग्रामोन्नती मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नारायणगाव या संशोधन केंद्रातून आपले संशोधन कार्य पूर्ण केले. संशोधन केंद्राचे मार्गदर्शक प्रा. डॉ. श्रीकांत फुलसुंदर यांनी त्यांना मार्गदर्शन केले. इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष श्री. रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, संस्था पदाधिकारी, वाणिज्य विभागप्रमुख प्रा. रुपकमल भोसले तसेच सहकारी प्राध्यापक यांनी डॉ. मिटकर यांना भावी वाटचालीबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.






