कृष्णराव भेगडे इंग्लिश मिडियम स्कूलची शैक्षणिक सौर ऊर्जा प्रकल्प भेट यशस्वी

SHARE NOW

तळेगाव दाभाडे

कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलच्या इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी या शैक्षणिक सौर ऊर्जा प्रकल्पा भेटीचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत विद्यार्थ्यांनी उद्योजक मा. रामदासजी काकडे यांच्या आर .एम. के इन्फ्रास्ट्रक्चरच्या सौर ऊर्जा प्रकल्पला भेट दिली. आर .एम. के इन्फ्रास्ट्रक्चर व्यवस्थापनाच्या सहकार्यामुळे तसेच उद्योजक मा. रामदासजी काकडे यांच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे हि भेट यशस्वीरित्या पार पडली.

विद्यार्थ्यांनी गुरुवार, दि. १८ डिसेंबर २०२५ रोजी या सौर ऊर्जा प्रकल्प भेटीचा लाभ घेतला. विद्यार्थी सकाळी ९.१५ वाजता शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या परिसरातून प्रकल्प स्थळी रवाना झाली.

Advertisement

प्रकल्प स्थळी पोहोचल्यानंतर कंपनीच्या प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून प्रकल्पामधील अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना सौरऊर्जा, नूतनीकरणीय स्रोत आणि शाश्वत ऊर्जा निर्मिती याविषयी मौल्यवान व्यावहारिक ज्ञान दिले तसेच सौर पॅनेलद्वारे सूर्यप्रकाशाचे विद्युत ऊर्जेत रूपांतर कसे होते , सौर पॅनेलची देखभाल तसेच पर्यावरण संरक्षणासाठी अक्षय ऊर्जेचे याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला व उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारून आपल्या शंकांचे समाधान करून घेतले. ही शैक्षणिक सौर ऊर्जा प्रकल्प भेट विद्यार्थ्यांसाठी अत्यंत ज्ञानवर्धक, प्रेरणादायी व माहितीपूर्ण ठरली .बदलत्या काळानुसार अधिकाधिक प्रमाणात सौर ऊर्जेचा वापर केल्यास प्रदुषणावर नियंत्रण मिळू शकते व मानवी जीवन सुखमय होईल, हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावी पर्यंत पोहचला.

या क्षेत्रभेटीचे नियोजन शाळेच्या उपमुख्याध्यापिका सौ ज्योती सावंत मॅडम यांनी केले होते व विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या संबधीत वर्गशिक्षक , क्रिडा शिक्षक तसेच श्री संतोष साखरे सर उपस्थित होते.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page