कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न

SHARE NOW

तळेगाव दाभाडे

 

शनिवार दिनांक 20 डिसेंबर 2025- तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचलित कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूल येथे वार्षिक क्रीडा स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात पारंपारिक पद्धतीने सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने झाली. यानंतर सौ मीरा चव्हाण यांनी उपस्थितांचे मनःपूर्वक स्वागत केले यावेळी संस्थेचे मा. संदीपजी काकडे सर ,संचालिका सौ गौरी काकडे मॅडम, सौ सोनल काकडे मॅडम, सौ सुप्रिया काकडे मॅडम, शाळेचे माजी विद्यार्थी मा.पार्थ संदीप काकडे, शाळेच्या उपमुख्यध्यापिका सौ ज्योती सावंत मॅडम तसेच मुख्याध्यापिका मिस टी एन साईलक्ष्मी मॅडम यांच्या उपस्थितीत होते .

Advertisement

याप्रसंगी शाळेचे माजी विद्यार्थी मा पार्थ काकडे यांनी विद्यार्थ्यांना जीवनामधील खेळाचे महत्व सांगत आपल्या शालेय आठवणींना उजाळा दिला व प्रेरणादायी मार्गदर्शन केले.उपमुख्याध्यापिका सौ ज्योती सावंत मॅडम यांनी खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त ,संघभावना व चिकाटी निर्माण होते. केवळ पदक मिळवणे नव्हे तर प्रयत्न महत्त्वाचे असतात असे मत व्यक्त केले व मुख्याध्यापिका मिस टी एन साईलक्ष्मी मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून विजेत्यांचे अभिनंदन केले.

 

संस्थेचे अध्यक्ष मा संदीपजी काकडे यांनी विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याचे विशेष कौतुक करून शारीरिक व मानसिक विकासासाठी खेळाचे महत्व अधोरेखित केले . हार जीत पेक्षा खेळात सहभागी होणे महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांनी भविष्यात राष्ट्रीय स्तरावर शाळेचे नाव उज्वल करावे असे प्रोत्साहन दिले तसेच शिक्षकांच्या परिश्रमाचेही त्यांनी विशेष कौतुक केले .

यानंतर क्रीडा स्पर्धातील वैयक्तिक व सांघिक खेळामधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पदके, प्रमाणपत्रे आणि चषक प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने करण्यात आला.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page