ब्रह्माण्ड किड्स स्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न…

SHARE NOW

मावळ

 

वडगाव मावळ येथील ब्रह्माण्ड किड्स स्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन द्वारकाधीश लॉन्स येथे उत्साहात पार पडले. शेकडो पालकांच्या उपस्थितीत विद्यार्थांनी आपापले नृत्य, गायन, वादन निरनिराळे सामाजिक संदेश देऊन सादरीकरण केले. सदर स्नेहसंमेलनाचे प्रास्ताविक सौं.गायत्री कडू यांनी केले. उदघाटन दिपप्रज्वलननाने डॉ.प्रशांत कदम यांनी केले. मुलांच्या भवितव्याबाबत व्याख्यान करताना इतिहास संशोधक डॉ.प्रमोद बोराडे म्हणाले, “भारतमातेच्या नव्या पिढीला मोठ्या आणि अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे. आपल्या उगवत्या तरुणाईला कोणतीही पार्श्वभूमी नसेल तरी गुणवत्ता असल्यास त्यांचा विकास आणि यश कोणीही थांबू शकत नाही. जगाच्या पाठीवर कोणत्याही क्षेत्रांमध्ये डोकावले की टॉप टेन सर्व विजेते हे विना पार्श्वभूमी यशस्वी झालेले दिसून येतात. याउलट मोठी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक पार्श्वभूमी लाभलेल्या घराण्यात यशस्वीतेची परंपरा, चिकाटी नव्या पिढीत येताना दिसून येत नाही. प्रचंड आणि भव्य यश हे सामान्य माणसांसाठीच राखीव असते.”

Advertisement

निरनिराळ्या वेशभूषेत मुलांनी नानाविध नृत्य सादर केली. पालकांनी देखील मनोगते व्यक्त केली. ब्रह्मांड स्कूलच्या शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी सर्वांनी मोठ्या मेहनतीने सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला. स्कुलच्या संस्थापक अध्यक्ष सौं.चित्रा मोहिते व उपाध्यक्ष डॉ.प्रिया बोराडे यांनी उत्कृष्ठ नियोजन करीत कार्यक्रम मोठ्या उंचीवर नेऊन ठेवला. बाल शिवव्याख्याता रुद्रप्रताप बोराडे याने शिवचरित्रावर केलेल्या व्याख्यानातून मोठे उत्साही वातावरण तयार झाले. आभार प्रदर्शन श्री.आनंद कडू व श्री.सचिन मोहिते यांनी केले. समारंभाच्या अखेरीस स्नेहभोजन झाले. “आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी ब्रम्हांड किड्स स्कूलला भेट द्यावी असे आवाहन अध्यक्ष सौं.चित्रा मोहिते यांनी केले आहे…


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page