लोणावळ्यात चोरीचे सत्र सुरूच. ९ जून रोजी पुन्हा चोरी. घरफोडी करून २९ लाखाचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरले
लोणावळा: खंडाळा परिसरातील राजुजी कॉलनी येथे एका बंगल्यात भर दिवसा घडलेल्या घर फोडीत अज्ञात चोट्याने तब्बल २९ लाख२६ हजार रुपये किमतीच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यावर डल्ला मारला ही घटना ९ जून २०२५ रोजी सकाळी उघडकीस आली. विणा नारायण मुळे(वय ६५ वर्ष राहणार भवानी प्रसाद बंगला राजुजी कॉलनी जुना खंडाळा बँक हाऊस शेजारी) यांनी या घरफोडीबाबत लोणावळा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून. तक्रारदाराच्या बंगला परिसरातील मुख्य गेट व दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला. व कपाटातील मौल्यवान दागिने लंपास केले. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे १२ तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या किंमत.७.२०.०००.=८ तोळ्याच्या ६४ सोन्याच्या पाटल्या. किंमत.४.८०.०००.=५ तोळ्याच्या २ सोन्याच्या साखळ्या किंमत.३०.००००=१० तोळ्याचे २ शिंदेशाही तोडे किंमत.६.०००००.=१.५ तोळ्याची सोन्याची अंगठी किंमत.९०.०००=६ ग्रॅमचे३ सोन्याचे कानातले जोड किंमत.३६.०००=८.९ तोळ्याचे २ सोन्याचे नेकलेस किंमत.५.४०.०००=१ तोळ्याच्या ४ सोन्याच्या बांगड्या किंमत.६०.०००=२ किलो चांदीचे भांडे व पूजाच्या वस्तू किंमत.१.००.०००= असा एकूण २९.२६.००० लाखाचा ऐवज चोरट्याने चोरून नेला आहे. लोणावळा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात घरफोडीचा व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत असून श्वान पथक व ठसे तज्ञांच्या मदतीने या चोरीचा तपास सुरू आहे. या आधी देखील शहरात डॉक्टर खंडेलवाल व जैन मंदिरात तसेच अन्य ठिकाणी चोरी झाली असून त्या गुन्ह्यातील चोरट्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही लोणावळा खंडाळा परिसरात चोरीचे सत्र सुरू असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.