मावळ मधील लोणावळा,कार्ला लेणी,पवना धरणासह अन्य पर्यटन स्थळावर ३१ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू
पुणे : वर्षा विहार पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डूडी यांनी पर्यटन स्थळ परिसरात ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत नागरिक सुरक्षा संहिता २०२३चे कलम १६३ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. मावळ तालुक्यातील एकवीरा देवी.कार्ला लेणी. भाजे लेणी. भाजे धबधबा. लोहगड विसापूर तिकोना किल्ला. टायगर पॉईंट. लायन्स पॉईंट. शिवलिंग पॉईंट. पवना धरण या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहे. वरील ठिकाणी पावसाळी पर्यटनासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात अशावेळी नागरिकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून वरील ठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहे. प्रतिबंधात्मक ठिकाणी मद्यपान करणे. मद्य धुंद अवस्थेत प्रवेश. मद्य जवळ बाळगणे त्याची वाहतूक करणे अनाधिकृत मद्यपान करणे विक्री करणे. वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबवणे. बेदरक पणे वाहन चालवणे. धोकादायक परिस्थितीमध्ये ओव्हरटेक करणे. सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ कचरा काचेच्या व प्लॅस्टिकच्या बाटल्या थर्मोकोलचे प्लास्टिकचे साहित्य उघड्यावर व इतरत्र फेकून देणे यावर देखील प्रतिबंध करण्यात आला आहे तसेच मोठ्या आवाजात डीजे व गाडीतील साऊंड सिस्टिम वाजवणे. सार्वजनिक ठिकाणी सभ्यवर्तन करणे. जल.वायू. ध्वनी प्रदूषण होईल अशी कोणतीही कृती करण्यास प्रतिबंध असेल. धरण. धबधबे. नदी. तलाव आदी परिसरात सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश मनाई करण्यात आली आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनांना अनुमती असेल. या आदेशाचे कोणतेही व्यक्ती. संस्था. संघटना यांनी उल्लंघन केल्यास भारतीय न्याय संहिता २०२३चे कलम २२३ नुसार दंडनीय अथवा कायदेशीर कारवाई पात्र राहतील असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.