लोणावळ्यातील रखड़लेल्या विकास कामांबद्दल भाजपने प्रशासनाला न्यायालयीन समिति (कोर्ट कमिटी) समोर धरले धारेवर.

लोणावळा :

लोणावळा नगरपरिषद सभागृहात लोणावळ्यातील रखडलेल्या विविध विकास कामांबाबत लोणावळा शहर भाजपच्या शिष्टमंडळाने घेतली न्यायालयीन समिती (कोर्ट कमिटी) ची भेट या भेटीत नगरपरिषद प्रशासनाला धरले धारेवर . यावेळी शहरात भेडसावणारी वाहतुक कोंडी, भांगरवाडी नांगरगाव रखड़लेल्या उड्डानपुलाचे कामाबाबत, खंडाळा तलाव सुशोभीकरण व बंद झालेली बोटिंग सेवा या विकास कामांबद्दल प्रशासनाला प्रश्न विचारण्यात आले. या प्रसंगी ,उच्च न्यायालय निवृत्त न्यायाधीश डॉ.एस. राधाकृष्णन,राज्याचे माजी निवृत्त मुख्य सचिव जगदीश जोशी,नगर रचना विभागाचे निवृत्त संचालक, व्ही.डब्ल्यू.देशपांडे,स्थानिक समिति सदस्य तनु मेहता,दिनेश राणावत,मुख्याधिकारी,प्रशासकअशोक साबळे , उपमुख्याधिकारी कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत मा. नगराध्यक्ष सुरेखा जाधव, मा. उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी,शहराध्यक्ष,अरुण लाड, मा.नगरसेवक गटनेते,देवीदास कडू, बाळासाहेब जाधव,यांनी शहरातील प्रलंबित विषयांवर ,विविध रखड़लेल्या विकास कामाच्या प्रश्नबाबत चर्चा करून समितिसमोर विषय मांडले.

Advertisement

खंडाळ्यातील तलाव सुशोभीकरण करावे,तेथील अतिक्रमण काढावे,भांगरवाडी, नांगरगाव उड्डानपुलाचे रखड़लेले काम सुरू करावे,या पुलाच्या कामात अड़थळा आलेल्या इमारतीला कोणी , कधी परवानगी दिली याबाबत चौकशी करून त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.

 

नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या कामाबाबात तुम्ही वेळेवर कामें पूर्ण करित नसल्यामुळे आम्हाला जनतेच्या रोशाला सामोरे जावे लागत आहे असे देवीदास कडू यांनी व्यक्त केले.मागिल एका बैठकित प्रशासनाने सांगीतले होते की मे महिन्यात पूल पूर्ण होईल पण अद्याप पूर्ण नाही याला जबाबदार कोन? असेल त्या अधिकारयावर कायदेशीर कारवाई करावी असे ही त्यांनी व्यक्त केले .तसेच या बैठकीत,जयप्रकाश परदेशी,प्रफुल्ल काकडे,सहाय्यक, नगर रचनाकार अतुल केंद्रे,नगरपरिषद अभियंता यशवंत मुंडे,नगरपरिषद,अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page