निधन वार्ता सीताबाई भेगडे यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन
तळेगाव दाभाडे:
तळेगाव दाभाडे येथील वारकरी संप्रदाय व शेतकरी कुटुंबातील आदर्श माता सीताबाई लक्ष्मण भेगडे(मोठी आई )वय ८७ वर्ष यांचे गुरुवारी (दि.२७) वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.त्यांच्या मागे दोन मुले, चार मुली, पुतणे, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते दिगंबर भेगडे, चंद्रकांत भेगडे यांच्या त्या मातोश्री, तर माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या त्या चुलती होत. माळेचा (दशक्रिया )विधी तिसऱ्या दिवशी शनिवारी (दि.२९) सकाळी ८.३० वाजता श्री बनेश्वर स्मशानभूमी तळेगाव दाभाडे येथे होईल. याप्रसंगी हभप तुषार महाराज दळवी यांची प्रवचनरुपी सेवा होणार आहे.
Advertisement







