रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीच्या छत्रछायेचा गोरगरिबांना आसरा
तळेगाव दाभाडे,
रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीच्या वतीने व संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगावातील व परिसरातील रस्त्यावरील गरजू विक्रेत्यांना पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्रछाया या प्रकल्पांतर्गत मोठ्या छत्र्यांचे वाटप करण्यात आले.

शहरातील भाजी विक्रेते, फळ विक्रेते, चर्मकार आदींना याचा लाभ मिळाला. आपण केवळ छत्री वाटप करत नसून या कष्टकऱ्यांचे जीवन सुसह्य होण्यासाठी व त्यांना सुरक्षितता लाभण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे अध्यक्ष मिलिंद शेलार यांनी यावेळी सांगितले.प्रकल्प प्रमुख सुवर्णा मते, उमा पवार, सुषमा गराडे, शंकर हदीमणी, दशरथ जांभुळकर, विलास टकले, संदीप मगर, हिरामण बोत्रे, अजय पाटील यांनी प्रकल्प यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे यांनी प्रकल्प यशस्वी करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले.

देवई सुरते (भाजी विक्रेती) हातावर पोट असणाऱ्या माझ्यासारख्या अनेकांचे ऊन आणि पावसापासून संरक्षण होण्यासाठी रोटरी क्लब ऑफ एमआयडीसीने दिलेल्या छत्रीमुळे मोठे सहकार्य होणार आहे असे मत व्यक्त केले.






