एमआयटी ज्युनिअर कॉलेज तळेगाव दाभाडेच्या मुलींचा खो-खो संघ तालुकास्तरावर प्रथम क्रमांकावर!
तळेगाव दाभाडे (2025-26):

क्रीडा व युवा सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य; पुणे जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सिद्धांत इंटरनॅशनल स्कूल, सुदुबेरे, तळेगाव दाभाडे येथे आयोजित तालुकास्तरीय आंतरशालेय क्रीडा स्पर्धा 2025-26 उत्साहात पार पडली.
या स्पर्धेत खो-खो या क्रीडा प्रकारात एमआयटी ज्युनिअर कॉलेज, तळेगाव दाभाडे च्या १९ वर्षे वयोगटाखालील मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला असून, त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
तसेच, मुलांच्या संघाने तिसरा क्रमांक मिळवत उत्तम कामगिरी केली आहे.
मुख्याध्यापक श्री. के. चौधरी यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन करून पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
या यशामागे क्रीडाशिक्षक मानसी देशमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
सर्व खेळाडूंना मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!






