तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या आगामी येणाऱ्या निवडणुकांसाठी १४ प्रभाग व २८ नगरसेवकांची संरचना निश्चित.

SHARE NOW

तळेगाव दाभाडे:

Advertisement

नगरविकास विभागाने २०११च्या जनगणनेच्या आधारे प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने आगामी येणाऱ्या तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीसाठी नवीन रचनेनुसार एकूण १४ प्रभाग निश्चित करण्यात आले असून प्रत्येकी २ नगरसेवक अशा एकूण २८ नगरसेवकांची निवड केली जाणार आहे. या रचनेमुळे अखेर तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. ओबीसी समाजाला २०२२ पूर्वी लागू असलेले आरक्षण यावेळी देखील कायम राहणार असून सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला चार महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सुमारे तीन वर्षापासून प्रशासकीय राजवटी खाली असलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीची प्रतीक्षा आता संपली आहे. या संदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी सांगितले की शासनाच्या सूचनेनुसार दोन सदस्य प्रभाग रचनेचा अहवाल तयार केला असून तो लवकरच जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येईल. आगामी निवडणुकीत तळेगावचे राजकीय चित्र बदलणार असल्याचे अनेक जाणकारांनी सांगितले. मागील पंचवार्षिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे १४ नगरसेवक. तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीचे ६ नगरसेवक तर जनसेवा विकास समितीचे ६ नगरसेवक निवडून आले होते. तीनही गटात प्रत्येकी एक स्वीकृत नगरसेवक होता. भारतीय जनता पक्षाच्या चित्रा जगनाडे नगराध्यक्ष म्हणून जनतेमधून निवडून आल्या होत्या. त्यानंतरच्या घडामोडी मध्ये भाजपाकडे १२ नगरसेवक तर तळेगाव शहर विकास समितीकडे ७ नगरसेवक तर जनसेवा विकास समितीकडे ७ नगरसेवक होते त्यानंतर नगरपरिषदेत प्रशासकीय राजवट लागू करण्यात आली. प्रशासकीय राजवटीच्या काळात अनेक विकास कामे रखडली आहेत. त्यामुळे नव्या लोकप्रतिनिधींची निवड झाल्यानंतर शहराच्या विविध विकास योजनांना गती मिळेल असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत तर दुसरीकडे अनेक इच्छुक नगरसेवकांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page