*7 पारितोषिके व रँक 2 सह रोटरी मावळचा डिस्ट्रिक्ट मध्ये डंका*
मावळ :
रोटरी क्लब ऑफ मावळ चे हे पाचव वर्ष असून सलग दोनही वर्षी रोटरी क्लब ऑफ मावळणे डिस्ट्रिक्ट मेंबरशिप सेमिनार मध्ये सबंध डिस्ट्रिक्ट मध्ये मॅक्सिमम मेंबर्स ॲड करून आपल्या नावाचा डंका वाजवला आहे. रोटरी क्लब ऑफ मावळच्या यशाच्या या घोडदौडीमध्ये अध्यक्ष रो नितीन घोटकुले व मेंबरशिप डीरेक्टर ॲड.रो.दीपक चव्हाण यांचे विशेष प्रयत्न होते. यावर्षीच्या सेमिनारमध्ये मॅक्सिमम मेंबरशिप ग्रोथ, मॅक्सिमम लेडी रोटेरियन इत्यादी सात अवेन्यू मध्ये रोटरी मावळने सर्वोच्च अशा डायमंड कॅटेगरीमध्ये पारितोषिके पटकावली.
डिस्ट्रिक्ट 3131 चे रविवार दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी बंटारा भवन,बाणेर येथे पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात
DG रो शितल शहा,मेंबरशिप चेअर PDG रो पंकज शहा,DGN रो.नितीन ढमाले,AG रो. रवींद्र भावे तसेच डिस्ट्रिक्ट मेंबरशिप डायरेक्टर रो.जिग्नेश पंड्या आणि सर्व डिस्ट्रिक्ट सदस्य या सर्वांच्या उपस्थित मध्ये रोटरी मावळ क्लबचे अध्यक्ष रो. नितीन घोटकुले उपाध्यक्षा रो. रेशमा फडतरे सेक्रेटरी रो पूनम देसाई मेंबरशिप डिरेक्टर ॲड.रो.दीपक चव्हाण आयपीपी रो. सुनील पवार सदस्य रो.रवींद्र नहाळदे,रो. राजेंद्र दळवी, रो. स्नेहल घोटकुले रो. रत्नावली इंगळे यांना सन्मानित करण्यात आले.
सबंध डिस्ट्रिक्ट मध्ये रोटरी क्लब ऑफ मावळचा द्वितीय पारितोषिकाने सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर AG. रो.रवींद्र भावे यांना बेस्ट AG इन डीस्ट्रीक्ट या पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.
रोटरी क्लब ऑफ मावळच्या यशाच्या या परंपरेबद्दल क्लबचे फाउंडर व मेंटोर रो.मनोज ढमाले यांनी क्लब सदस्यांचे कौतुक केले.