भास्करराव म्हाळसकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित कोल्हापूर येथे ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य अधिवेशनात पुरस्कार प्रदान.
मावळ :
ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांचे वतीने मावळ तालुका भाजपा प्रभारी , मावळ विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष, ज्येष्ठ मार्गदर्शक भास्करराव ( आप्पा ) म्हाळसकर यांना विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल समाजभूषण पुरस्कार या पुरस्काराने गौरविण्यात आले.
कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या राज्य अधिवेशनात संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या ग्राहक पंचायतीच्या पदाधिकारी आणि नागरिकांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष विजय लाड यांच्या हस्ते आणि राज्य सचिव अरुण वाघमारे , संघटक सर्जेराव जाधव, सह संघटक मेधा कुलकर्णी , सूनिताराजे घाटगे , एस.एन.पाटील, हेमंत मराठे , अशोक अगरवाल आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मावळ तालुक्यातून देखील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर या सन्मान सोहळ्यासाठी उपस्थित होते.
भास्करराव म्हाळसकर यांनी सन्मानाला उत्तर देतांना सामाजिक कार्य व्यक्तीला समाजमनाच्या ह्रदयात स्थान मिळवून देते असे मत व्यक्त केले आणि स्वामी विवेकानंद यांनी जीवन जगतांना सांगितलेल्या बहुमूल्य सूत्रांची माहिती आहे.
मानपत्र , सन्मानचिन्ह , शाल , श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.