महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते आणि विचारवंत प्रा. प्रदीप कदम यांना शांतिदूत सेवारत्न पुरस्कार जाहीर.
पिंपरी चिंचवड :
महाराष्ट्रातील प्रसिद्ध प्रेरणादायी वक्ते आणि विचारवंत प्रा.प्रदीप कदम यांना शांतिदूत परिवाराच्या वतीने 26 जून रोजी राजर्षी शाहू महाराज जयंतीच्या निमित्ताने शांतिदूत सेवारत्न पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन पुण्यातील नवी पेठ मधील LOC हॉस्पिटल येथे करण्यात येत आहे.
सेवा निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य आणि शांतिदूत परिवाराचे संस्थापक डॉ. विठ्ठल जाधव (IPS) या कार्यक्रमाचे नियोजन करत आहेत.
प्रा. प्रदीप कदम हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते असून त्यांनी गेल्या 16 वर्षात महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राबाहेर आतापर्यंत 2500 पेक्षा अधिक व्याख्याने दिली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, रणधुरंधर छावा शंभूराजे, प्रेरणा युवकांसाठी, आदर्श महामानवांचा, भक्ती शक्ती, समाज प्रबोधन काळाची गरज, अशा विविध विषयांवर प्रा. प्रदीप कदम हे सातत्याने व्याख्याने देत असतात. पिंपरी चिंचवड मधील कॉनक्वेस्ट महाविद्यालयात प्रा.प्रदीप कदम प्राचार्य म्हणून काम करत आहेत. शिक्षणापासून वंचित असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी शैक्षणिक प्रवाहात आणलेले आहे. प्रदीप कदम सर हे स्वतः एम.ए.,एम.एड., एम.फील., एम.बी.ए. असून ते पीएचडी करत आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहिशाल मंडळाचे प्रा.प्रदीप कदम हे वक्ते आहेत. गेल्या 1000 दिवसांपासून दररोज सकाळी प्रा. कदम यांचे प्रेरणादायी व्हिडिओ सोशियल मीडियावर अपलोड होत असतात. महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्र बाहेरही प्रदीप कदम सरांचे अनेक चाहते आहेत. अतिशय मेहनतीने आणि खडतर प्रवासाने प्रदीप कदम यांनी यश मिळवले आहे.
प्रदीप कदम यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल यापूर्वीही नॅशनल प्राईड ऑफ इंडिया पुरस्कार, सह्याद्री गौरव पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. शांतिदूत परिवाराच्या वतीने शांतिदूत सेवारत्न पुरस्कार देऊन प्रा. प्रदीप कदम यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे त्यामुळे समाजातील विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन आणि कौतुक केले जात आहे. त्यांच्या कार्याला शुभेच्छा…