पर्यावरण दिनानिमित्त श्रीक्षेत्र घोरावडेश्वर डोंगर पायथा, शेलारवाडी या ठिकाणी डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयाच्या वतीने पर्यावरण दिन साजरा करण्यात आला
आकुर्डी:
डॉ. डी. वाय पाटील युनिटेक सोसायटीचे, डॉ. डी. वाय पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि डॉ. डी. वाय . पाटील विज्ञान व संगणकशास्त्र महाविद्यालय, आकुर्डी यांच्या वतीने पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण आणि औषधी वनस्पती वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पर्यावरण दिनानिमित्त मौजे शेलारवाडी येथे महाविद्यालयाच्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून 21 वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये आंबा, वड, चिंच, पिंपळ अशा वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले.
यानंतर महाविद्यालयात औषधी वनस्पती वितरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ह्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून देहूरोड कॅन्टोन्मेंट मंडळाचे माजी उपाध्यक्ष अध्यक्ष भारतीय जनता पार्टी श्रीक्षेत्र देहू–देहूरोड भाजपा मंडळ श्री. रघुविर उद्धवराव शेलार उपस्थित होते. तसेच विशेष उपस्थितीमध्ये पुणे जिल्हा भाजपा उपाध्यक्ष श्री. बाळासाहेब शेलार, घोरवडेश्वर विकास प्रतिष्ठानचे सचिव श्री. योगेश शेलार, नगरसेवक रघुवीर शेलार स्नेह ग्रुपचे पदाधिकारी श्री. महेशशेठ आरशेलू उपस्थित होते.
प्रारंभी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन वामन यांनी पर्यावरणाचे मानवी जीवनामध्ये असलेले महत्त्व सांगून पर्यावरण संगोपन आणि संवर्धन कशा पद्धतीने करता येईल याविषयी उपस्थितांना माहिती दिली. यानंतर सर्व उपस्थित प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी यांनी पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली. यानंतर सर्व उपस्थितांना औषधी वृक्षाचे प्रमुख पाहुण्यांच्या आणि प्राचार्याच्या हस्ते वितरण करण्यात आले. प्रमुख पाहुणे श्री. रघुवीर शेलार यांनी मार्गदर्शन करताना पर्यावरण हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग असून पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आपण कायम तत्पर असले पाहिजे. पर्यावरणासाठी सतत काम करत राहिले पाहिजे असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भागवत देशमुख यांनी केले तर आभार प्रा. शुभांगी पाटील यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या आयोजनात डॉ. मुकेश तिवारी, डॉ. विजय गाडे, डॉ. मीनल भोसले, डॉ. खालीद शेख, प्रा. अर्चना सुतार, प्रा. सतीश ठाकर, प्रा. भागवत देशमुख, प्रा. रोहित वरडकर, प्रा. आकाश शिर्के, डॉ. वर्षा निंबाळकर प्रा. अभिषेक पोखरकर ,श्री. राजेश भगत, उपकुलसचिव श्रीमती मनीषा पवार मॅडम, श्री निलेश शिंदे या व इतर सर्व प्राध्यापकांनी आणि प्राध्यापकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला.