मुलींचे स्वास्थ,शिक्षण महत्वाचे त्याकडे दुर्लक्ष करू नका : संतोष खांडगे
तळेगाव दाभाडे :
मुलींचे स्वास्थ आणि शिक्षण हे दोन्ही महत्त्वाचे आहे त्याकडे दुर्लक्ष करू नका असे मत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे यांनी व्यक्त केले.
रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी आणि कै. एडवोकेट कुमारी शलाका संतोष खांडगे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कै. एडवोकेट कुमारी शलाका संतोष खांडगे यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये विद्यार्थिनींसाठी हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी खांडगे बोलत होते.
रोटरी क्लबचे अध्यक्ष मिलिंद शेलार यांनी प्रास्ताविक केले.
उपक्रमाचे प्रकल्प प्रमुख डॉक्टर सुरभी नागरे यांनी विद्यार्थिनींना हिमोग्लोबिन वाढीबद्दल आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी डॉक्टर युवराज बडे, रजनीगंधा खांडगे, अजिंक्य खांडगे, सचिन कोळवणकर, संदीप मगर, मुख्याध्यापक रावसाहेब शिरसाठ, पर्यवेक्षिका रेणू शर्मा उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री पाटील यांनी केले संदीप मगर यांनी आभार मानले.