पर्यटनासाठी आलेल्या दोन तरुणांचा भुशी धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू
लोणावळा: लोणावळा शहराजवळ असलेल्या भुशी धरणात आज रविवार दिनांक ८जुन २०२५ रोजी दुपारच्या सुमारास पर्यटनासाठी आलेल्या दोन तरुणांच्या बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. साहिल अशरफ अली शेख ( वय १९) मोहम्मद जमील( वय २२. थेरगाव .पिंपरी चिंचवड. मूळ राहणार मिर्झापूर उत्तर प्रदेश) अशी धरणात बुडालेल्या तरुणांची नावे आहेत. साहिल आणि जमील हे दोघे रविवारी सकाळी लोणावळा परिसरातील भुशी धरणाच्या बॅक वॉटर मध्ये पर्यटनासाठी आले होते. ते दोघेही दुपारी भुशी धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले असता त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांना या घटनेची माहिती मिळतात त्यांनी तत्काळ शिवदुर्ग मित्र लोणावळा या रेस्क्यू पथकाला घटनास्थळी बोलविले. शिवदुर्गाचे महेश मसणे. सचिन गायकवाड. कपिल दळवी. योगेश दळवी. दुर्वेश साठे. कुणाल कडू. हर्षल चौधरी. नीरज आवंढे. अशोक उंबरे. पिंटू मानकर. साहेबराव चव्हाण. श्याम वाल्मीक. महादेव भवर. राजेंद्र कडू. अनिल आंद्रे. यांच्या पथकाने दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. उत्तरीय तपासणीनंतर दोघांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. भुशी धरणात दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याने वर्षाविहाराची सुरुवात दुर्घटनात रूपांतर झाली आहे. अशी चर्चा सर्वत्र होत आहे.