तेली कार्यालय ट्रस्ट व तेली समाज गणेशोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने, तळेगाव दाभाडे चे सुपुत्र, मुंबई शहर उपनगर चे माजी जिल्हाधिकारी मा.राजेंद्र क्षीरसागर साहेब ( I.A.S.) व तेली समाजातील 10 वी, 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सन्मान समारोह मोठ्या उत्साहात संपन्न मोठ्या उत्साहात संपन्न
तळेगाव दाभाडे :
दिनांक 06/06/2025 रोजी तळेगाव दाभाडे येथे, तेली कार्यालय ट्रस्ट व तेली समाज गणेशोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने, तळेगाव दाभाडे चे सुपुत्र, मुंबई शहर उपनगर चे माजी जिल्हाधिकारी मा.राजेंद्र क्षीरसागर साहेब ( I.A.S.) व तेली समाजातील 10 वी, 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सन्मान करण्यात आला.
या सन्मान सोहळ्यास विशेष उपस्थिती ,महाराष्ट्र राज्याचे माजी अप्पर जिल्हाधिकारी मा.राजेश कुलकर्णी साहेब, तळेगाव दाभाडे शहराच्या मा. नगराध्यक्षा चित्राताई जगनाडे, मीराताई फल्ले, तेली कार्यालय ट्रस्ट विश्वस्त देवेंद्र बारमुख, अध्यक्ष बाळकृष्ण क्षीरसागर, राजेश राऊत, सुदुंबरे तेली संस्थांनचे विश्वस्त प्रशांतजी भागवत यांची प्रमुख उपस्थित लाभली. व्यासपीठावरील मान्यवरानी मा. राजेंद्र क्षीरसागर साहेबांच्या महाराष्ट्र राज्याच्या प्रशाशन सेवेत कार्यरत असताना केलेल्या जनतेच्या सेवेचा त्याच प्रमाणे त्यांच्या सेवा काळातील मिळालेल्या पुरस्कारांचा त्यांच्या अतिशय मोजक्या शब्दात ठळकपणे सर्व उपस्थितांचे पटकन लक्षात येईल अशा प्रकारे, त्यांचे कार्याचा मागोवा घेतला.
मा. प्राध्यापक मनीषा पिंगळे मॅडम यांनी संयोजकांच्या वतीने राजेंद्र क्षीरसागर साहेब यांच्या मानपत्राचे वाचन करून, त्यांचे महसूल खात्यातील सेवेचा परामर्श उपस्थितांसमोर अतिशय व्यवस्थित रित्या मांडला.
उपस्थित मान्यवरांचे हस्ते मानपत्र प्रदान केल्यानंतर 10 वी व 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना त्यांचे पालकांसह गौरविण्यात आले. सन्माननीय राजेंद्र क्षीरसागर साहेब यांनी त्यांच्या सन्मानप्रित्यर्थ कृतज्ञता व्यक्त करून त्यांनी 10वी,12 वी चे विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षणाचे, योग्य संगतीचे, शिस्तीचे, महत्व पटवून दिले त्याच बरोबरे तळेगाव दाभाडे शहरातील विशेषतः तेली आळीतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. भविष्यात तेली समाजातील विद्यार्थ्यांनसाठी सुसज्ज आधुनिक स्वरूपातील अभ्यासिका उभारण्यासाठी मदत करण्याचे आश्वाशन यावेळी त्यांनी दिले.
सदर सन्मान सोहळ्यास राजेंद्र क्षीरसागर यांचा कौटुंबिक परिवार, मित्र परिवार, तळेगाव दाभाडे शहरातील तेली समाज आवर्जून उपस्थित होता.
सोहळा यशस्वी करण्यासाठी तेली कार्यालय ट्रस्ट चे विश्वस्त बाळकृष्ण क्षीरसागर, संजय कसाबी, संदिप जगनाडे, वैभव कोतुळकर, रणजित पिंगळे, तुषार जगनाडे, गोकुळ किरवे, शैलेश मखामले सर्व विश्वस्त तसेच तेली समाज सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री समीर टेकवडे, महेंद्र कसाबी, विजय केदारी, सुजित लोखंडे, अजय शेलार, अतुल जगनाडे, संजय बारमुख, स्वप्नील बारमुख यांनी विशेष मेहनत घेतली.