शिक्षकांचे निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण उत्साहाने सुरू…
पुणे
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण कार्यक्रम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी संपन्न होत आहे. शिक्षकांचे निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण मोठ्या उत्साहाने सुरू असून सर्व शिक्षक मोठ्या उत्साहाने या प्रशिक्षणात सहभागी झाल्याचे चित्र पाहावयास मिळते. पुणे येथील मॉडर्न मॉडर्न कला महाविद्यालय शिवाजी नगर या ठिकाणी शिक्षकांचे प्रशिक्षण सुरू असून अनेक शिक्षक प्रशिक्षणार्थी या प्रशिक्षणासाठी उपस्थित राहून अध्यापनाची नवीन कौशल्य, अध्ययन क्षमता व बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक नवीन पर्यावरण शिक्षण व आपत्ती व्यवस्थापन, शैक्षणिक संशोधन, पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान अशा अनेक विषयावर हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 तसेच एकविसाव्या शतकासाठीचे अध्यापनाची कौशल्य अशा विविध घटकांची चर्चा होऊन शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. प्रशिक्षणाची सुरुवात शालेय परिपाठाने होत असून प्रशिक्षणाच्या शेवटी वंदे मातरम घेऊन समारोप केला जातो. मॉडर्न कला महाविद्यालय शिवाजी नगर येथे शिक्षक प्रशिक्षणा दरम्यान अनेक नामवंत तज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण आयोजित केले जात आहे.
या वेळी तज्ञ मार्गदर्शक – सुलभक म्हणून
श्री. भगवान पांडेकर,
सो. स्नेहल पाटोळे,
सौ. संगिता वरुडकर
यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण संपन्न होत आहे.
या वेळी बोलताना प्रशिक्षणाचे केंद्र प्रमुख
डॉ. प्रभाकर क्षीरसागर
जेष्ठ अधिव्याख्याता
पुणे डाएट यांनी सांगितले की, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण मॉडर्न कला महाविद्यालय शिवाजीनगर येथे अतिशय उत्साहात संपन्न होत असून सर्व शिक्षकांनी या प्रशिक्षणात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. सर्व शासकीय नियमांचे पालन करून हे प्रशिक्षण संपन्न होत आहे.
प्रतिक्रिया.
शिक्षक हा सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्व असून विद्यार्थ्यांच्या हितासाठी शिक्षकांचे प्रशिक्षण महत्त्वाचे असते.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, उद्याच्या सक्षम भारतासाठी नवीन सुसंस्कृत अन आदर्श पिढी घडविण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे. याच शिक्षकांना मार्गदर्शन करताना मनस्वी आनंद होतो आहे.
तज्ञ मार्गदर्शक
श्री. भगवान पांडेकर.
शिक्षक समुपदेशक