तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नव्या इमारतीचे लोकार्पण येत्या सोमवार दि. २० ऑक्टोबर रोजी
तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची नवी इमारत “डॉ. केशव बळीराम हेडगेवार भवन” या नावाने साकारली असून, या नव्या वास्तूचे लोकार्पण सोहळा सोमवार, दिनांक २० ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
हा लोकार्पण समारंभ शिवशंभू तीर्थ मैदान, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या समोर येथे पार पडणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री .अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते होणार आहे.
या सोहळ्याचे निमंत्रक आहेत . सुनील शंकरराव शेळके. (आमदार, मावळ विधानसभा).
तळेगाव दाभाडे नगरपरिषद, सर्व माजी नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडणार असून, सर्व नागरिकांनी या ऐतिहासिक सोहळ्यास उपस्थित राहून साक्षीदार व्हावे, असे आवाहन नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.






