सोनू अनाजी वाळंज माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षक-कर्मचाऱ्यांची अविस्मरणीय सहल – शिमला, कुल्लू, मनाली
(दिनांक ५ मे २०२५ ते १४ मे २०२५)
शिक्षकांचे जीवन हे ज्ञानदानाच्या निरंतर प्रवासाने व्यापलेले असते. शाळेतील काम, जबाबदाऱ्या आणि उपक्रमांच्या धकाधकीत काही निवांत क्षणांचा शोध प्रत्येकालाच असतो. अशा वेळी जर निसर्गाच्या सान्निध्यात क्षणभर विरंगुळा मिळाला, तर तो जीवनात एक सुंदर आठवण ठरतो. याच हेतूने कोराईगड शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व जेष्ठ समाजसेवक मा. श्री नंदकुमार वाळंज व आंबवणे च्या मा. आदर्श सरपंच मा. सौ. वत्सलाताई वाळंज यांच्या संकल्पनेतून या सहलीचे आयोजन केले.
हा आनंदाचा प्रसंग निर्माण केला कॅनरी रिसॉर्ट चे चेअरमन मा. मिलिंद वाळंज सरांनी, ज्यांच्या पुढाकाराने ५ मे २०२५ ते १४ मे २०२५ या काळात सोनू अनाजी वाळंज माध्यमिक विद्यालयाच्या आंबवणे येथील शिक्षक व कर्मचारी वर्गासाठी त्यांच्या कुटुंबासह हिमालयाच्या कुशीत वसलेल्या शिमला, कुल्लू आणि मनाली येथे सहलीचे आयोजन करण्यात आले.
ही सहल म्हणजे नुसता प्रवास नव्हता, तर निसर्गाच्या सान्निध्यात आनंद, हास्य, सौंदर्य आणि आपुलकीने भरलेला एक अविस्मरणीय अनुभव होता. थंडीच्या गारव्यात ऊबदार आठवणी, बर्फाच्छादित पर्वतांचे विहंगम दृश्य, आणि शिक्षकांच्या चेहऱ्यावरचा आनंद – या सर्वांनी एक अनोखी गोष्ट घडवून आणली.
मा. मिलिंद वाळंज सरांचे या संपूर्ण सहल आयोजनासाठी मनःपूर्वक आभार. त्यांचे नेतृत्व, नियोजन व सहृदयता यांमुळेच ही सहल एक संस्मरणीय पर्वणी ठरली.
या आठवणी काळजाच्या कप्प्यात जपल्या जातील आणि शिक्षणाच्या वाटचालीत नवचैतन्याचा श्वास देतील.असे मत शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री भटू देवरे यांनी व्यक्त केले. सर्व शिक्षक कर्मचारी यांनी सहलीच्या नियोजनात परिश्रम घेतले आणि सहल यशस्वी केली.