एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटला नॅकचे ए प्लस मानांकन

पिंपरी, पुणे (दि. १ ऑक्टोंबर २०२४) पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटला “नॅकचे ए प्लस” मानांकन प्राप्त झाले आहे. एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या महाविद्यालयाने राष्ट्रीय मुल्यांकन व प्रत्यायन परिषदेची नॅकची ए प्लस श्रेणी दुसऱ्या फेरीमध्ये प्राप्त केली आहे अशी माहिती पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ची स्थापना २००९ साली झाली. ही संस्था स्थापने पासूनच शैक्षणिक क्षेत्रात आघाडीवर आहे. या आधी संस्थेला नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडीटेशन (एनबीए) मानांकन पहिल्या फेरीत पटकावले होते. आता या महाविद्यालयाच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. राष्ट्रीय मूल्यांकन व प्रत्यायन परिषद म्हणजेच ‘नॅक’चे परीक्षण महाविद्यालयाने यशस्वीरीत्या पूर्ण केले असून ‘ए प्लस’ ही श्रेणी पुढील पाच वर्षांसाठी परीक्षणाच्या दुसऱ्याच फेरीत प्राप्त केली आहे. तसेच सुरुवातीपासूनच महाविद्यालयाची वाटचाल शैक्षणिक प्राविण्य, संशोधन व नवनिर्माण, व्यवसायाभिमुखता आणि सामाजिक बांधिलकी या चतु:सुत्रीवर चालली असून विद्यार्थ्यांच्या क्रमिक अभ्यासक्रमाबरोबरच क्रीडा, सांस्कृतिक आदी सर्वांगीण विकासावर महाविद्यालय भर देत असल्याने ‘नॅक’च्या परीक्षणात यश मिळाले. सर्व विश्वस्तांचे सहकार्य आणि अध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांचे योगदान यामुळे हे मानांकन प्राप्त झाले. येथे दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचा दर्जा, प्रशिक्षण व मार्गदर्शनामुळे महाविद्यालयाच्या बहुतांशी विद्यार्थ्यांना उत्तम नोकरीच्या संधी उपलब्ध होतात असेही पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी सांगितले.

Advertisement

एसबीपीआयएमच्या संचालिका डॉ. कीर्ती धारवाडकर यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, संशोधन विभाग व राष्ट्रीय परिषदेसाठीही एसबीपीआयएम चर्चेत असते. आता राष्ट्रीय पातळीवरील बहुमुल्य सन्मान प्राप्त करून देशातील एक अग्रगण्य शिक्षणसंस्था म्हणून लौकिक मिळवला आहे.

     पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी या यशाबद्दल महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. कीर्ती धारवाडकर, ‘नॅक’चे समन्वयक डॉ. अमरीश पद्मा व सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page