रोटरी सिटीतर्फे इंजिनियर्स डे उत्साहात साजरा.
रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी मधील ११ इंजिनियर्स यांचा सन्मान इंजिनियर्स डे चे औचित्य साधून रविवार दिनांक २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता हॉटेल शितल येथे साजरा करण्यात आला.
याप्रसंगी जेष्ठ रोटरीयन हरिश्चंद्रगडसिंग सर यांनी रोटरी सिटीने आमचा सन्मान करून घरातील लोकांनी आपल्या पाठीवर शाबासकीची थाप मारली याचा वेगळा आनंद आम्हा सर्व इंजिनियर्सला झाला असे मत व्यक्त केले.
तर सहप्रांतपाल, माजी अध्यक्ष रो दीपक फल्ले यांनी कृतज्ञता व्यक्त करून क्लब तर्फे आम्हां सर्व इंजिनियर्सचा सत्कार करण्यात आला याबद्दल आम्ही क्लबचे ऋणी आहोत.
रोटरी सिटीचे अध्यक्ष किरण ओसवाल यांनी सर्व इंजिनियर्सना यांना शुभेच्छा व्यक्त करून आपल्यासारखे ११ इंजिनियर्स या क्लब मध्ये असल्यामुळे क्लबला एक वेगळी उंची प्राप्त होते याचा आम्हाला खूप अभिमान आहे असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी ज्येष्ठ रोटरियन दिलीप भाई पारेख माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, संतोष परदेशी, संजय मेहता,विनोद राठोड,प्रदीप मुंगसे हे उपस्थित होते.
हरिश्चंद्र गडसिंग,दादासाहेब उरे,शशिकांत हाळदे,दीपक फल्ले,निखिल महापात्रा,रितेश फाकटकर,हर्षल पंडित,प्रशांत ताये,दिनेश चिखले,राकेश गरुड,विकी बेल्हेकर या सर्व इंजिनिअर्स यांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे नियोजन राकेश ओसवाल तानाजी मराठे दशरथ ढमढेरे रघुनाथ कश्यप डॉक्टर गणपत जाधव यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश दाभाडे यांनी तर आभार प्रदर्शन भगवान शिंदे यांनी केले.