डॉ. डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना दीक्षांत प्रमाणपत्रांचे वितरण

SHARE NOW

पुणे:

डॉ. डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस, वराळे येथे नुकताच विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभ उत्साहात झाला. अनुदीप फाऊंडेशनच्या सहकार्याने राबविण्यात आलेला आय.टी.पी.आर. (कोर जावा) कौशल्यविकास कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या ३५०हून अधिक विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते दीक्षांत प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

आजच्या स्पर्धात्मक युगात पदवी शिक्षणासोबत अद्ययावत तांत्रिक कौशल्ये आवश्यक असल्याचे प्रतिपादन मान्यवरांनी केले. या गरजेची दखल घेऊन महाविद्यालयाने अनुदीप फाऊंडेशनच्या माध्यमातून विशेष कौशल्यविकास उपक्रम राबविला. या कोर्सद्वारे विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आधुनिक ज्ञानासह व्यावसायिक कौशल्यांचे सखोल प्रशिक्षण देण्यात आले, ज्यामुळे त्यांच्या रोजगारक्षमतेत निश्चितच वाढ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Advertisement

कार्यक्रमास प्राचार्य डॉ. एस. डी. शिरबहादुरकर, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. वाय. बी. गुरव तसेच अनुदीप फाऊंडेशनचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन प्रा. आशिष जावके (ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर) यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुशांत पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अॅड. अनुजा पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे हा दीक्षांत समारंभ यशस्वी ठरला.

Highlights:

• आय.टी.पी.आर. (कोर जावा) कोर्स पूर्ण करणाऱ्या ३५०हून अधिक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण

• महाविद्यालय व अनुदीप फाऊंडेशनच्या संयुक्त कौशल्यविकास उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

• रोजगाराभिमुख शिक्षणावर मान्यवरांचा भर


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page