रोटरॅक्ट जिल्हा ३१३१तर्फे, कम्युनिटी सर्व्हिस अॅव्हेन्यूच्या पुढाकाराने, ‘पालखी सेवा’ उपक्रम यशस्वीरीत्या संपन्न
पुणे, २१ जून २०२५ – रोटरॅक्ट जिल्हा ३१३१तर्फे, कम्युनिटी सर्व्हिस अॅव्हेन्यूच्या पुढाकाराने, ‘पालखी सेवा’ उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात आला. आषाढी वारीच्या निमित्ताने वारकऱ्यांना आवश्यक मदत पुरविण्याचा उद्देश या सेवेमागे होता.
या उपक्रमात १००० हून अधिक वारकऱ्यांना पिण्याचे पाणी, अल्पोपहार आणि वैद्यकीय मदत पुरविण्यात आली. तसेच रोटरी क्लब पुणे वेस्ट साइड च्या मेंबर्स- डॉ. गौरी जोशी आणि डॉ. अनिता किर्लोस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले, ज्याचा लाभ सुमारे ४०० वारकऱ्यांनी घेतला.
या उपक्रमास रोटरी डिस्ट्रिक्टचे मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये DRRE द्विजेश नाशिककर, जिल्हा सरचिटणीस मनोनीत निहारिका चतुर्वेदी, जिल्हा खजिनदार सत्त्यजीत कराळे पाटील, जिल्हा कम्युनिटी सर्व्हिस डायरेक्टर आर्यन देवंने, तसेच सह-कम्युनिटी सर्व्हिस डायरेक्टर साक्षी उंदेगावकर यांचा समावेश होता.
याशिवाय, रोटरॅक्ट जिल्हा ३१३१मधील विविध क्लबमधील सदस्यांनी देखील मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला व उपक्रमात सक्रिय पाठबळ दिले.
समाजसेवा आणि मानवीय मूल्यांप्रती रोटरीची बांधिलकी या उपक्रमातून अधोरेखित झाली.






