सोमाटणेच्या उपसरपंचपदी शैलेश बाजीराव मुऱ्हे यांची बिनविरोध निवड
सोमाटणे:
सोमाटणेच्या उपसरपंचपदी शैलेश बाजीराव मुऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली.
ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच स्वाती कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत ही निवड करण्यात आली. निवडणूक निर्णायक अधिकारी म्हणून ग्रामसेवक अक्षय खोमणे यांनी काम पाहिले. अश्विनी मुऱ्हे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त असलेल्या उपसरपंच पदाकरिता शैलेश मुऱ्हे यांचा एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध निवड झाली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य अश्विनी मुऱ्हे, नवनाथ मुऱ्हे, राकेश मुऱ्हे,, विशाल मुऱ्हे, नितीन मुऱ्हे आदी उपस्थित होते. यावेळी मुऱ्हे यांचे अभिनंदन केले.