हिंदविजय पतसंस्थेचे संस्थापक ॲड.श्री रवींद्रनाथ जयवंतराव दाभाडे यांच्या वाढदिवसानिमित्त सरसेनापती उमाबाई दाभाडे प्राथमिक कन्या क्र.४ मध्ये नगरपरिषद शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप
तळेगाव दाभाडे :
सरसेनापती उमाबाई दाभाडे प्राथमिक कन्या क्र.४ मध्ये नगरपरिषद शिक्षण विभागातील प्रशासनाधिकारी मा.शिल्पाताई रोडगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदविजय पतसंस्थेचे संस्थापक ॲड.श्री रवींद्रनाथ जयवंतराव दाभाडे यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाकरिता राजेश सरोदे,कैलास भेगडे, दत्तात्रय कांदळकर ,ओंकार दाभाडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती करिता निस्वार्थ भावनेने मदत करणाऱ्या हिंदविजय पतसंस्थेच्या उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता तिकोने मॅडम यांनी आभार मानले. हिंदविजय पतसंस्थेचे सेक्रेटरी कैलास भेगडे यांनी विद्यार्थिनींना शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आयोजन वैशाली साबळे ,ताहेरा बासडे, सोनाली घाटे व प्राची लोमटे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकिता शितोळे यांनी केले.