*श्री संत ज्ञानेश्वर शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात साजरा*
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे स्टेशन भागातील श्री संत ज्ञानेश्वर शाळेत उन्हाळ्याची सुट्टी संपल्यानंतरचा शनिवारी(दि.१५) पहिल्या दिवसा निमित्त प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या प्रशासन अधिकारी शिल्पा रोडगे,मुख्याध्यापक केशव चिमटे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी १ली ते ९वी च्या सुमारे ३५० विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्त्या रुपाली दाभाडे,राष्ट्रीय मानव अधिकार संघटना महिला उपाध्यक्ष रेखा भेगडे, शशीकला कारके,ज्योती राजीवडे,शालेय व्यवस्थापन समिती सदस्य,पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.यावेळी शाळेचा परिसर सुशोभित करण्यात आला होता.आकर्षक रांगोळी काढण्यात आलेली होती.यावेळी विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीने आलेली पुस्तके देण्यात आली तसेच शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.






