*इंदोरी पुलावरून आत्महत्या केलेल्या तरुणाची ओळख पटली*
इंदोरी :
इंदोरी ता.मावळ येथील पुलावरुन बुधवारी (दि.१८) नदीत उडी घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाची ओळख अखेर पोलिसांनी पटवली असून, ही आत्महत्या आर्थिक अडचणीमुळे झाल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. सदर तरुणाचे नाव पोपट पांडुरंग साळवे (वय ३९), मूळ राहणार छत्रपती संभाजीनगर आणि सध्या निघोजे येथे वास्तव्यास होते. ते तेथील एका कंपनीत सुरक्षारक्षक पदावर कार्यरत होते.घटनेनंतर पुलाजवळ आढळून आलेली दुचाकी ही चोरीची असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांसमोर ओळख पटवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले होते. बुधवारी(दि.२५) कुंडमळा परिसरात नदीमध्ये एक मृतदेह तरंगताना आढळून आल्याची माहिती तळेगाव दाभाडे एमआयडीसी पोलीस स्टेशनला मिळाली.
पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांच्यामार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रशांत रेळेकर व पोलीस कॉन्स्टेबल कोठावळे आणि दंडगुले यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेहाजवळ सापडलेल्या मोबाईलच्या साहाय्याने तांत्रिक तपास करत सदर मृत व्यक्तीची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले.