सटवाई माता वर्धापन दिनानिमित्त वडेश्वर गावचे ग्रामदेवता कुलस्वामिनी आई सटवाई मातेला पालखी अर्पण.
आंदर मावळ (वडेश्वर):
बुधवार दिनांक 2 एप्रिल रोजी सटवाई माता वर्धापन दिन सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये दिवसभर सकाळी देवीचा अभिषेक, मुखवटा मिरवणूक, सत्यनारायण महापूजा, कीर्तन, दुपारी महाप्रसाद, सामुदायिक हरिजागर, सायंकाळी हरिपाठ, महाआरती, जेवण, तसेच रात्री आराध्य मेळावा श्री. वाघजाई माता गायन मंडळ कुसवली यांचे असे विविध कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार आहेत.
लहान बालके जन्मला आल्यावर सटवाई त्याच्या पाचवीला नशीब लिहते या भावनेतून महारास्ट्रामधील दूर दूर वरून सटवाईवाडी वडेश्वर येथील डोंगरावर वसलेल्या दाट जंगलामध्ये सटवाई मातेच्या असलेल्या मंदिरात दर्शनासाठी माता आपल्या नवजात मुलांना दर्शनाला घेऊन येत असतात.
चैत्र पंचमीला देवीची यात्रा संपन्न होत असते तर नवरात्र उत्सव मध्ये नऊ दिवस भाविक दर्शनाला गर्दी करत असतात.देवीवर श्रद्धा असणारे शिवसेना तालुका प्रमुख श्री राजेश खांडभोर व मा. सरपंच सौ संतोषी राजेश खांडभोर यांचे चिरंजीव कु अमन व आर्यन खांडभोर यांच्या परिवार कडून देवीच्या मिरवणूकीसाठी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पालखी ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज मंदिर येथे ग्रामस्थानच्या उपस्थित पूजा करून सटवाई माता तरुण मंडळ यांच्या कडे संपूर्द करण्यात आली. गावातील नागरिक मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थित होते