*इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालय विज्ञान विभागाची कास पठार येथे जैवविविधता अभ्यास सहल*

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

मंगळवार दिनांक 8 ऑक्टोबर 2024 रोजी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान विभागातील इयत्ता 12 वी च्या जीवशास्त्र विषय असलेल्या विद्यार्थ्यांची अभ्यास सहल आयोजित करण्यात आली होती.

या अभ्यास सहलीत विद्यार्थ्यांनी सातारा येथील कास पठारावरील जैवविविधतेचा अभ्यास केला.तेथील फुलझाडे वनस्पती यांच्या विविध प्रजातीचा अभ्यास केला. तसेच ठोसेघर धबधबा या स्थळालाही भेट दिली.

या अभ्यास सहलीत एकूण 120 विद्यार्थी , 19 शिक्षक आणि 3 शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. या अभ्यास सहलीचे मुख्य हेतू विद्यार्थ्यांमध्ये जीवशास्त्र विषयाची गोडी निर्माण करणे आणि निसर्गाच्या जवळ नेणे हे होते.

 

Advertisement

ही अभ्यास सहल विज्ञान विभागाच्या जीवशास्त्र विभागाकडून आयोजित करण्यात आली. याचे आयोजन विज्ञान विभागाचे विभागप्रमुख तसेच जीवशास्त्र विषयाचे प्राध्यापक श्री खाडप सर आणि प्रा. शिंदे मॅडम यांनी केले होते. तसेच , यात जीवशास्त्र विषयाच्या सह प्राध्यापिका कन्हेरिकर मॅडम , प्रा.कोलते मॅडम, , प्रा.दामोदरे मॅडम , पंधारे मॅडम तसेच इतर सर्व विज्ञान विभागाचे प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

या अभ्यास सहल आयोजनात महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री भोसले सर, प्राचार्य मा .डॉ. मलघे सर तसेच इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष मा. श्री . रामदासजी काकडे साहेब आणि कार्यवाह मा . श्री. चंद्रकांतजी शेटे साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page